गहाळ स्मार्टफोन तपासात सापडले

गहाळ स्मार्टफोन तपासात सापडले

Published on

गहाळ स्मार्टफोन तपासात सापडले

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ ः ‘सेंट्रल एक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर ॲप’च्या माध्यमातून गहाळ झालेल्या पाच मोबाईलचा शोध लावण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले. हे मोबाईल मूळ मालकांना परत केले आहेत, अशी माहिती सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनीष कोल्हटकर यांनी दिली.
भारत सरकारद्वारे मोबाईल चोरी किंवा हरवणे याबाबतच्या तक्रारींबाबत मोबाईल शोधून तो मोबाईलधारकांना परत मिळवून देण्यासाठी सेंट्रल एक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर हे ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलद्वारे ज्या व्यक्तींचे मोबाईल गहाळ होतात किंवा चोरीस जातात, त्याची माहिती https://www.ceir.gov.in या संकेतस्थळाद्वारे सेंट्रल एक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात. तक्रार नोंदविल्यानंतर पोलिस विभागाकडून त्याबाबत तांत्रिक पद्धतीने हा मोबाईल शोधून संबंधित मोबाईलधारकांना योग्य त्या तजविजीने परत केला जातो. याबाबत पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सावंतवाडीच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कोल्हटकर व पोलिस कॉन्स्टेबल योगेश मुंढे यांनी ५ मोबाईल फोन हस्तगत करून मूळ तक्रारदारांना परत केले आहेत. मोबाईल गहाळ अगर हरवला किंवा चोरीस गेल्यास तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन कोल्हटकर यांनी केले आहे.
95228

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com