''लायन्स''ची समाजसेवा अखंडित ठेवू

''लायन्स''ची समाजसेवा अखंडित ठेवू

Published on

95337

‘लायन्स’ची समाजसेवा अखंडित ठेवू
चंद्रशेखर पुनाळेकरः कुडाळात नूतन पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ः या वर्षात लायन्स क्लब कुडाळ सिंधुदुर्ग ही तुमच्या सर्वांच्या सहकार्याने अधिक चांगल्या प्रकारे कामगिरी करून समाजाला अधिक चांगली सेवा देईल, असा विश्वास लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर यांनी केले. येथे आयोजित शानदार सोहळ्यात कुडाळ लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण पार पडले.
लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गच्या नूतन कार्यकारिणीने शनिवारी (ता. ६) सायंकाळी येथील महालक्ष्मी हॉलमध्ये झालेल्या शानदार पदग्रहण सोहळ्यात लायनिस्टिक वर्ष २०२४-२५ साठी जुन्या कार्यकारिणीकडून सूत्रे हाती घेतली. नूतन अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, सचिव आनंद बांदिवडेकर, खजिनदार सूरज भोगटे यांच्यासह नवीन सभासदांनी पदभार स्वीकारला. पीएमजेएफ माजी प्रांतपाल सुनील सुतार कुरुंदवाड, लायन अॅड. विजय जमदग्नी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.
कुडाळ महालक्ष्मी हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्याचे उद्घाटन लायन माजी प्रांतपाल सुनील सुतार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी अॅड. जमदग्नी यांच्यासह मावळत्या अध्यक्ष सीए जयंती कुलकर्णी, सचिव स्नेहा नाईक, खजिनदार आनंद बांदिवडेकर, रिजन चेअरमन गजानन नाईक, झोन चेअरमन विश्वास गावकर, अॅड. समीर कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. विवेक पाटणकर आणि स्नेहांकिता माने यांनी ईशस्तवन आणि गणेश स्तवनाने कार्यक्रमाची सुरेल सुरुवात केली. मिलिंद बोर्डवेकर यांनी श्री. सुतार यांची, डॉ. सुशांता कुलकर्णी यांनी अॅड. विजय जमदग्नी यांची, लायन मंजुनाथ फडके यांनी गजानन नाईक यांची तर सीए शैलेश मुंडये यांनी विश्वास गावकर यांची ओळख करून दिली. मावळत्या सचिव स्नेहा नाईक यांनी सेक्रेटरी रिपोर्ट तर मावळते खंजिनदार आनंद बांदिवडेकर यांनी खजिनदार रिपोर्ट सादर केला.
नवीन कार्यकारिणीत सहभागी झालेल्या तहसीलदार वीरसिंग वसावे, राजन कोरगावकर, मंगेश तेंडोलकर, सचिन सावंत, साईश सामंत, पंकज देसाई आणि नितीन दळवी यांना इंडक्टिंग ऑफिसर अॅड. जमदग्नी यांनी शपथ दिली. त्यांनतर  पदग्रहण अधिकारी प्रांतपाल सुतार यांनी नवीन कार्यकारिणीकडे पदभार सोपविला. यामध्ये अध्यक्ष पुनाळेकर, आयपीपी जयंती कुलकर्णी, उपाध्यक्ष मिलिंद बांदिवडेकर, जीवन बांदेकर, मंदार शिरसाट, आनंद बांदिवडेकर, कुणाल वरसकर, सूरज भोगटे, गणेश म्हाडदळकर, मंजुनाथ फडके, चैतन्य तेरसे, सुधाकर कुलकर्णी, डॉ. अमोघ चुबे, सागर तेली, वैभव सावंत, अॅड. अजित भणगे, सुनेत्रा फाटक, केशव फाटक, हेमंत कुडाळकर, मनोहर कामत, डॉ. विवेक पाटणकर, अॅड. अमोल सामंत, मंदार परुळेकर, अॅड. श्रीनिवास नाईक, अनंत शिंदे, नयन भणगे, स्नेहांकिता माने, अस्मिता बांदेकर आणि डी. दत्ताराम यांचे स्वागत करण्यात आले.
गजानन नाईक आणि विश्वास गावकर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अॅड. समीर कुलकर्णी यांनी मानले.
......
चौकट
गुणवंतांचा गौरव
यावेळी एन. व्ही. विद्यालय पांग्रडच्या मुलांना स्कूल बॅग वितरित करण्यात आल्या. लायन्स कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात स्वरा कुलकर्णी, अथर्व बोर्डवेकर, अर्पिता सामंत, श्रीया गुरव, शरयू चुबे यांचा सन्मानचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या ''भेरा'' चित्रपटाच्या यशाबद्दल या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या श्रद्धा खानोलकर आणि पटकथा लेखक प्रसाद खानोलकर यांचा देखील सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.