दापोलीतील 15 विद्यार्थी

दापोलीतील 15 विद्यार्थी

Published on

शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत
दापोलीतील १५ विद्यार्थी
गावतळे, ता. ७ ः नुकत्याच जाहीर झालेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत दापोली तालुक्यातून १९ पैकी १५ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधील आहेत. कर्दे शाळेचा प्रणव वैजयंत देवघरकर व कुडावळे नंबर १ मधील प्रणित प्रशांत किरवे यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर ओणनवसे पाटील शाळेतील प्रणाली प्रकाश टेमकर हिने तालुक्यात द्वितीय आणि गावरई शाळेतील परी रमेश प्रजापती हिने तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
तालुक्यातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, विस्ताराधिकारी बळीराम राठोड, रामचंद्र सांगडे, पद्मन लहांगे यांनी तसेच सर्व केंद्रप्रमुख यांनी कर्दे, गावरई, कादिवली, कुडावळे, चंद्रनगर, हर्णे, ओळगाव, पंचनदी, सातेरे तर्फ नातू, राजापूर या शाळांमध्ये भेट देत सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे गावरई शाळेतील तीन आणि कर्दे शाळेतील दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले.
व्हिजन दापोली अभियानाचे सचिव शशिकांत बैकर आणि सदस्य वैजयंत देवघरकर या मुख्य समिती सदस्यांच्या शाळेत अनुक्रमे तीन आणि दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. तर व्हिजन अध्यक्ष धनंजय शिरसाट यांच्या केंद्रातील कुडावळे आणि कादिवली शाळेतील प्रत्येकी एक विद्यार्थ्यांने प्राविण्य मिळवले. सर्व विद्यार्थ्यांचा यथायोग्य सत्कार सोहळा नुकताच करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.