खेड-कशेडी बोगद्याची आयआयटी पथकाकडून पाहणी

खेड-कशेडी बोगद्याची आयआयटी पथकाकडून पाहणी

Published on

कशेडी बोगद्याची आयआयटी पथकाकडून पाहणी
गळतीच्या अहवालाची प्रतीक्षा ; ग्राऊटींगचे काम वेगात
खेड, ता. ७ : मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात १४ ठिकाणी लागलेली गळती झरे किंवा डोंगरावरील विहिरीचे पाणी बोगद्यात झिरपत असल्याने लागल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मुंबई येथील आयआयटी पथकाचे प्रा. एस. के. यांनी बोगद्यात गळती लागलेल्या ठिकाणांची पाहणी केली. कशेडी बोगद्यातून दोन्ही दिशांचा प्रवास वेगवान झाला असला तरी ठिकठिकाणी लागलेल्या गळतींमुळे प्रवासात नवे ''विघ्न'' आले आहे. बोगद्यातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने उपाययोजना राबवण्यास सुरवात केली आहे. ग्राऊटींगचे काम वेगाने सुरू असून दोन पथके दिवस-रात्र कार्यरत आहेत. २० कामगारांच्या मदतीने गळती थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. ग्राऊटींगचे काम पूर्ण होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी लागणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले आहे. कशेडी बोगद्यात सुरू असलेली गळती झरे किंवा डोंगरावरील विहिरीचे पाणी झिरपून खाली येत असल्याचे पाहणी अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार आयआयटीच्या पथकाचे प्रा. एस. के. यांनी कशेडी बोगद्यातील गळती लागलेल्या ठिकाणांची संपूर्ण पाहणी केली. बोगद्यातून नेमके पाणी गळते कुठून याचा अभ्यास केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.