शिडवणेत पालकांसह मुलांना विविध शासकीय योजनांचे धडे
शासकीय योजनांचे
शिडवणेत मुलांना धडे
तळेरे : शासनाच्या विविध शैक्षणिक योजना पालकांना माहिती होण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिडवणे क्रमांक १ शाळेत ''योजनांचा जागर'' कार्यशाळा घेण्यात आली. त्यासोबत उत्कर्षांना ''चांगला स्पर्श व वाईट स्पर्श'' याबाबत प्रबोधन करण्यात आले. रस्ते व वाहतूक सुरक्षा अंतर्गत सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी प्रास्ताविक केले. हेमा वंजारी, सीमा वरुणकर आणि सुजाता कुडतरकर यांनी शैक्षणिक योजनांची सविस्तर माहिती दिली. निवृत्त पोलिस अधिकारी विजय टक्के यांनी ''चांगला स्पर्श, वाईट स्पर्श'' आणि ''रस्ते वाहतूक सुरक्षा'' यासंदर्भात उदाहरणे देत मार्गदर्शन केले. शिडवणे उपसरपंच दीपक पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये, शांताराम धुमाळ, सुप्रिया पाष्टे, सुप्रिया पांचाळ, स्मिता टक्के, महेंद्र टक्के, समिता सुतार, तारीफ शेख, मंजुळा गुंडये, सचिन टक्के, श्रीपत धुमाळ, सदाशिव कुडतरकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.