मालवणात ‘लाडकी बहिण''साठी अर्ज केंद्र

मालवणात ‘लाडकी बहिण''साठी अर्ज केंद्र

Published on

मालवणात ‘लाडकी बहिण''साठी अर्ज केंद्र
मालवण, ता. ७ ः ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या निर्देशानुसार येथील पालिकेच्या कार्यालयात मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या उपस्थितीत पालिका कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यानुसार पालिकेकडून महिला लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच अंगणवाडी केंद्रावर व पालिका कार्यालय येथे मोफत अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उद्यापासून (ता.६) शहरातील अंगणवाडी केंद्रांवर अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात येणार आहे. यात अंगणवाडी केंद्र वायरी अंबाजी शाळा श्रीमती अनुराधा पाटकर, अंगणवाडी केंद्र रेवतळे जिल्हा परिषद शाळा-श्रीमती दिपाली आरोंदेकर, अंगणवाडी केंद्र दांडी श्रीमती राधिका मोरजकर, अंगणवाडी केंद्र भरड श्रीमती शुभदा मोरे, अंगणवाडी केंद्र आडवण श्रीमती सुवर्णा चव्हाण, अंगणवाडी केंद्र महापुरुष वायरी श्रीमती कांचन परब आदी ठिकाणांचा समावेश आहे. या योजनेची विहित कालमर्यादेत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून भास्कर राऊळ यांची नेमणूक केली आहे. शहरातील पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जिरगे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.