बहीण माझी लाडकीच्या प्रचारासाठी शिबिरे

बहीण माझी लाडकीच्या प्रचारासाठी शिबिरे

बहीण माझी लाडकीच्या प्रचारासाठी शिबिरे
खेड : मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेच्‍या प्रचारासाठी शिवसेना शाखा कुडोशी, सुकीवली, मांडवे, बिजघर यांच्या वतीने शिबिरे झाली. ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज कसे भरावे, याचे मार्गदर्शन शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, संघटक महेंद्र भोसले यांनी केले. शिबिरात पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले. यावेळी सुप्रिया पवार, श्रीकांत शिर्के, राजेंद्र शेलार, मिलिंद काते, रूपेश कदम, राजेंद्र चाळके, सौरभ कदम तसेच शिवसैनिक व गावातील महिलांचा प्रतिसाद लाभला.

...अन्यथा पंचायत समिती आवारात शाळा भरवू
खेड : तालुक्यातील शिरवली नं. १ शाळेच्या वर्गखोलीवरील छत कोसळल्यानंतर सलग सहा दिवस पाठ फिरवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सातव्या दिवशी शाळेत किलबिलाट सुरू झाला आहे. ग्रामस्थांच्या बैठकीत पाल्यांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी कोसळलेल्या छताच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत दुरुस्ती न झाल्यास पंचायत समितीच्या आवारात विद्यार्थ्यांची शाळा भरवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. शिरवली नं. १ शाळेच्या वर्गखोल्यांचे छत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतरही पंचायत समितीचा शिक्षण विभाग ग्रामस्थांना केवळ थातूरमातूर उत्तरे देत बोळवण करण्यापलीकडे काहीच करत नसल्याचा सूर आळवला जात आहे.

विल्ये शाळेत शालेय साहित्याचे वाटप
राजापूर : तालुक्यातील विल्ये शाळा नं. २ मध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणप्रेमी अविनाश माने यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. स्कूल बॅगसह दहा डझन वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप तावडे, सरपंच सावली परवडी, दयानंद परवडी, मानसी तावडे, रसिका तावडे, मुख्याध्यापक दिलीप झिंबरे, शिक्षक संजय बाईत, मीनाक्षी गंगावणे, आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते माने यांनी गतवर्षी प्रशालेला वॉटर फिल्टर भेट देताना विद्यार्थ्यांना दहा डझन वह्यांचे वाटप केले होते.

लांजा शाळा नं. ५ मध्ये वृक्षारोपण
लांजा : साने गुरुजी विचारमंचातर्फे लांजा प्राथमिक शाळा नं. ५ मध्ये वृक्षरोपण करण्यात आले. कार्यक्रमाला तहसीलदार प्रमोद कदम, पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे, नायब तहसीलदार श्री गोसावी, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, वनविभागाचे वनपाल दिलीप आरेकर, ॲड. सावंत, मुख्याध्यापिका विमल चव्हाण, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com