रत्नागिरीत १६ हजार ८०० रुपयांचे ब्राऊन हेरॉइन जप्त

रत्नागिरीत १६ हजार ८०० रुपयांचे ब्राऊन हेरॉइन जप्त

Published on

रत्नागिरी शहरात
ब्राऊन हेरॉइन जप्त
दोघांना अटक ; विक्रीसाठी आणल्याचे स्पष्ट
रत्नागिरी, ता. ७ः शहरात रात्री गस्ती घालत असताना संशयितांकडून पोलिसांनी विक्रीसाठी आणलेला १६ हजार ८०० रुपयांचा ब्राऊन हेरॉईन हा अमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. सोहेब शकील सोलकर (३०, रा. राजिवडा, रत्नागिरी), आकिब काझी (रा. गवळीवाडा, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. ४) सायंकाळी शहरातील नाईक हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी शहरात गस्त घालत असताना नाईक हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी सोहेब सोलकर हा उभा दिसला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ब्राऊन हेरॉईन सापडले. त्याच्याकडे चौकशी केली असता विक्रीसाठी ब्राऊन हेरॉईन आणल्याचे स्पष्ट झाले. हा अमली पदार्थ त्यानी आकीब काझी यांच्याकडून आणल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. त्याचबरोबर या गुन्ह्याशी फैसल मकसूद यांच्या संबंध असल्याचे पुढे आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत हेरॉईनसह ५ हजारांचा मोबाइल आणि ५ हजार ८०० रुपये रोख जप्त केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.