''रोटरी''चे समाजासाठी भरीव योगदान

''रोटरी''चे समाजासाठी भरीव योगदान

Published on

''रोटरी''चे समाजासाठी भरीव योगदान
उत्कर्षा पाटील ः देवगडमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ७ ः कोरोना काळात ''रोटरी''ने भरीव काम केले. रोटरीच्या माध्यमातून समाजात मोठे काम होऊ शकते. यासाठी पदाधिकारी म्हणून मिळालेल्या संधीचा समाजाच्या कल्याणासाठी उपयोग करा, असे आवाहन उत्कर्षा पाटील (कोल्हापूर) यांनी येथे केले. भविष्यात मुलांच्या मनातही रोटरीबाबत प्रेम निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.
येथील रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्या नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा सौ. पाटील यांच्या उपस्थितीत झाला.त्यावेळी त्या बोलत होत्या. मंचावर नूतन अध्यक्षा मनस्वी घारे, सचिव गौरव पारकर, खजिनदार अनुश्री पारकर, मावळते अध्यक्ष प्रवीण पोकळे, मावळते सचिव विजय बांदिवडेकर, माजी अध्यक्ष हनिफ मेमन, प्रणय तेली, डॉ. विद्याधर तायशेटे, राजेश घाटवळ आदी उपस्थित होते. सौ. पाटील यांनी २०२४-२५ वर्षासाठी नूतन पदाधिकार्‍यांची नियुक्ती केली. यावेळी सौ. पाटील यांनी येथील रोटरीच्या कामकाजाबद्दल गौरवोद्गार काढून भविष्यातही चांगले उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. प्रणय तेली यांनी, रोटरी म्हणजे नुसत घेणं नाही, तर देत राहणं आणि समोरच्याचे होऊन जाणे असे असल्याचे सांगितले. डॉ. तायशेटे यांनी, मागील पदाधिकार्‍यांच्या कार्यकाळात मोठे आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. यावेळीही तसे शिबिर घेण्यासाठी नियोजन करावे, असे सुचविले. श्री. घाटवळ यांनी मार्गदर्शन केले. या सोहळ्याच्या निमित्ताने दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक जाणीवेतून सेवाकार्याचा गौरव म्हणून गीता घाडी यांचा, व्यवसाय आणि समाजकामासाठी प्रियांका साळसकर यांचा, कलाकार म्हणून ऋत्विक धुरी आणि आकाश सकपाळ यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. श्री. पोकळे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. तसेच आपल्या वर्षभराच्या कार्याचा धावता आढावा घेतला. सूत्रसंचालन श्रीपाद पारकर आणि शामल पोकळे यांनी केले. आभार मनीषा डामरी यांनी मानले.
..............
चौकट
रोटरी क्लबचे नवे शिलेदार
देवगड रोटरीच्या नव्या शिलेदारांमध्ये अध्यक्ष मनस्वी घारे, सचिव गौरव पारकर, खजिनदार अनुश्री पारकर, विजय बांदिवडेकर, अनिल गांधी, नरेश डामरी, अनिल कोरगावकर, दयानंद पाटील, प्रवीण पोकळे, प्रकाश गायकवाड, मनीषा डामरी, डॉ. उमेश पाटील, सुनीलदत्त पारकर, हनिफ मेमन, महेश घारे, अशोक मुजुमले, रमाकांत आचरेकर, शामल पोकळे, श्रीपाद पारकर, किरण पोकळे, रुपेश पारकर आदींनी पदभार स्वीकारला.
.............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.