वादळी पावसामुळे
देवगडात नुकसान

वादळी पावसामुळे देवगडात नुकसान

Published on

वादळी पावसामुळे
देवगडात नुकसान
देवगड, ता. ७ ः मध्यंतरीच्या विश्रांतीनंतर पावसाने आज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. वाऱ्यामुळे आणि पावसामुळे शिरगाव परिसरात वडाचे झाड पडून वाहतूक विस्कळीत झाली. तसेच दाभोळे येथे घरावर झाड पडून नुकसान झाल्याची माहिती येथील महसूल यंत्रणेने दिली.
देवगड नांदगाव या मुख्य रस्त्यावर शिरगाव येथील बाजारपेठेत वडाचे झाड पडून वाहतूक विस्कळीत झाली होती. दाभोळे येथे घरावर झाड पडून सुमारे ३० हजाराचे नुकसान झाले. तसेच शिरगाव येथील एका घराच्या छपराचे सुमारे ४० हजाराचे नुकसान झाल्याची माहिती येथील महसूल यंत्रणेने दिली. तालुक्याच्या सखल भागातही पाणी साचले होते. दिवसभर पावसाची झोड सुरू होती. आकाश काळवंडून येऊन जोरदार पाऊस सुरू होता. दरम्यान, उद्याही पावसाची लक्षणे असल्याची मानले जात आहे.
95525

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.