पडेल क्रमांक १ शाळेत
बालोद्यानाचे उद्घाटन

पडेल क्रमांक १ शाळेत बालोद्यानाचे उद्घाटन

Published on

पडेल क्रमांक १ शाळेत
बालोद्यानाचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ८ ः नीळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील दीक्षित फाउंडेशनतर्फे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पडेल क्रमांक १ ला सुसज्ज बालोद्यान व इमारतीच्या वरच्या मजल्यास ग्रील्स लावून देण्यात आले. याचे उद्‍घाटन व बालोद्यान प्रदान सोहळा सुनीता जोशी यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष निरंजन दीक्षित, सरपंच भूषण पोकळे, डॉ. आरोही दीक्षित, माजी सरपंच संजय मुळम, अकुंश टुकरुल, वैभव वारीक, भूषण बोडस, सुरेश देवळेकर आदी उपस्थित होते. सुनीता जोशी यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी भूषण पोकळे, संजय मुळम, वैभव वारीक, डॉ. आरोही दीक्षित आदींनी निरंजन दीक्षित यांच्या दातृत्वाविषयी गौरवोद्‌गार काढले. दीक्षित यांनी देणगीसाठी शैक्षणिक क्षेत्र निवडले. भावी पिढीला शाळांमध्ये आवश्यक असणाऱ्‍या भौतिक गरजा पुरविण्याचे कार्य ते करीत असून, त्यांच्या कार्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन करण्यात आले. केंद्रप्रमुख श्री. जाधव यांनी प्रास्ताविक केले.

९५५८८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.