स्पर्धा परीक्षांमधून कलागुण जोपासा

स्पर्धा परीक्षांमधून कलागुण जोपासा

Published on

95589

स्पर्धा परीक्षांमधून कलागुण जोपासा
वीरसिंग वसावेः नेरुरमध्ये चित्रभरण स्पर्धेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ः विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा. तरच या युगात आपण टिकू शकतो. याकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे, असे प्रतिपादन तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी नेरुरपार येथे केले. श्रीमती मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या चित्रभरण स्पर्धा उपक्रमात ते बोलत होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
श्रीमती मनोरमा चौधरी यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुरपार येथे विद्यार्थ्यांकरिता चित्रभरण स्पर्धा, दंत चिकित्सा व नेत्र चिकित्सा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत देवगड ते दोडामार्गपर्यंतच्या १५७ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. कुडाळ तहसीलदार वसावे यांच्या हस्ते व ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव संदीप साळसकर, नेरुरच्या प्रथम नागरिक भक्ती घाडीगावकर, वसुंधरा केंद्राचे व्यवस्थापक सतीश नाईक, डॉ. मयुरी ठाकूर, डॉ. जोशी, सिंधुदुर्ग न्यायालयाचे निवृत्त रजिस्ट्रार मठकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीम. मनोरमा चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादी शरद गटाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा तीन विभागांमध्ये घेण्यात आली. स्पर्धकांमधून पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
तहसीलदार वसावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात सांगितले की, सध्याचे युग हे स्पर्धात्मक असल्याने विद्यार्थ्यांनी अशा विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा. तरच या युगात आपण टिकू शकतो. याकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. यावेळी विद्यार्थ्यांना अमित सामंत, काका कुडाळकर, सरपंच भक्ती घाडी, मठकर यांनीही मार्गदर्शन केले. दयानंद चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये, ट्रस्टच्या स्थापनेपासून गेल्या २३ वर्षांमध्ये ट्रस्टच्या माध्यमातून जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध सामाजिक कार्याचा आढावा घेतला. डॉ. मयुरी ठाकूर यांच्यातर्फे विदयार्थ्यांची दंत तपासणी, तर डॉ. जोशी यांच्यातर्फे डोळ्यांची तपासणी करण्यात आली. प्रास्ताविक संदीप साळसकर यांनी केले. आभार प्रदर्शन सतीश नाईक यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.