-मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित

-मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित

-Rat८p२५.jpg-
P२४M९५५८५
तुळशी : घाटात कोसळलेली दरड बाजूला करून मार्ग मोकळा करण्यात आला.
-Rat८p२६.jpg-
P२४M९५५८६
निगडी : घरावर संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले.
-----------
मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित

मंडणगड तालुका ; तुळशी घाटातील दरड बाजूला, विक्रमी पावसाची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ८ ः दोन दिवसांपासून रौद्र रूप धारण केलेल्या मान्सूनचे पावसाने सोमवारी तालुक्यातील जनजीवन विस्कळित करून टाकले आहे. तुळशीघाटात रात्री दरड कोसळली. महसूल प्रशासनाने ती बाजूला करून बंद झालेली वाहतूक सुरू केली. निगडी येथे घरावर भिंत कोसळून घराचे नुकसान झाले.
तालुक्यात सरासरी १६५.२५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. यंदा हंगामात एका दिवसात पडणाऱ्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. यात मंडणगड महसूल मंडळात १३० मिमी, म्हाप्रळ- ११८ मिमी, देव्हारे- १८०, वेसवी- २३३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. एकूण ६६१ मिमी इतका पाऊस झाला. मान्सून सुरू झाल्यापासून तालुक्यात १२८१.९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील सावित्री भारजा, निवळी या मुख्या नद्यांसह लहान-मोठे ओढे दुथडी भरून वाहात आहेत याचबरोबर चिंचाळी व भोळवली ही दोन धरणे पूर्ण भरली असून अन्य धरणे ५५ टक्क्याहून अधिक भरली आहेत. मांदिवली व चिंचघरला जोडणाऱ्या पुलासह तालुक्यातील अनेक ठिकाणांच्या मोरी व कॉजवेवरून पाणी जाऊन अनेक गावांचा संपर्क तुटल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले. तुळशीघाटात रविवारी मध्यरात्री कोसळलेली दरड महसूल प्रशासनाने तातडीने बाजूला करून वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, याची दक्षता घेतली. मौजे निगडी येथील मनीषा निळकंठ खोपकर यांच्या घरावर बाजूला असलेली संरक्षण भिंत कोसळून घराच्या भिंतीला तडे जाऊन नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी देण्यात आली होती. तालुक्यात दोन दिवस पाऊस पडत असला तरी सुदैवाने मोठी वित्त व जीवितहानी झाल्याची माहिती पुढे आलेली नाही.

प्रवाशांचे हाल
व्यवसाय, नोकरी आणि वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडावे लागणाऱ्या प्रवाशांचे मात्र कमालीचे हाल झाले. पावसामुळे अनेक रस्ते बंद असल्यामुळे आणि अनेक बस फेऱ्यांचे मार्ग बदलावे लागण्याने प्रवाशांना वेळेत इच्छितस्थळी पोहचण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com