मत्स्यपालन प्रशिक्षण

मत्स्यपालन प्रशिक्षण

.
-rat८p११.jpg-
२४M९५५७६
हर्णै : स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत मत्स्यपालन प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रत्नागिरी जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार.
----------------

माशांपासून पदार्थ, हाऊसबोट प्रकल्प फायदेशीर

कीर्तीकिरण पुजार ः हर्णै येथे मत्स्यपालन प्रशिक्षणाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
हर्णै, ता. ८ : टाकाऊ माशांपासून खतनिर्मिती आणि मत्स्यतेल तसेच ताज्या माशांपासून विविध लोणची, चटणी बनविणे असे व्यवसाय सुरू करता येतील. सनड्रायरचा वापर करून माशांची साठवणूक करावी. हर्णै हा भाग पर्यटनस्थळ असल्याने बरेचसे पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. त्यामुळे माशांपासून पदार्थविक्री व हाउसबोट प्रकल्प फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले.
रत्नागिरीतील स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था व दापोली पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत हर्णै येथील मत्स्यपालन प्रशिक्षण उद्घाटन समारंभप्रसंगी बोलत होते. व्यवसाय करताना जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. सुरवातीला व्यवसाय छोट्या प्रमाणात करावा. बाजारातील मागणीनुसार व्यवसायाचे स्वरूप वाढवत न्यावे. उद्योग सुरू करताना भांडवलाच्या पूर्ततेसाठी बँकेकडून कर्ज आवश्यक असते. त्यासाठी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा जेणेकरून व्यवसाय उत्तमप्रकारे प्रगतीपथावर नेता येईल, असे पुजार यांनी सांगितले.
बँक ऑफ इंडिया ही अग्रणी बँक असल्याने अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवत असते. त्यापैकी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेने मागील वर्षामध्ये ८२१ विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवून त्यांना प्रशिक्षित केले व त्यांना आर्थिक पाठबळ पुरवले. स्वरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून दिले, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडिया आंचलिक प्रबंधक नरेंद्र देवरे यांनी केले. या वेळी बँक ऑफ इंडिया जिल्हा अग्रणी व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, गटविकास अधिकारी मंडलिक, सहाय्यक गटविकास अधिकारी खरात, ग्रामसेवक साळुंखे, हर्णै ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, उमेद अभियान तालुका व्यवस्थापक विशाल लांजेकर, अभिजित भंडारी, श्रीमती दडेमल, सीआरपी, स्टार स्वरोजगार संस्थेचे प्रसाद कांबळे, प्रशिक्षक दत्तात्रय टाळे व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com