पावसामुळे नुकसानीची भरपाई देणार

पावसामुळे नुकसानीची भरपाई देणार

Published on

95651

पावसामुळे नुकसानीची भरपाई देणार
नारायण राणेः घरांच्या भरपाईसाठी वेगळ्या निकषाचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ः जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची भरपाई मी व पालकमंत्री रवींद्र चव्हाण शासनाकडून मिळवून देवू. कोकणातील घरे वेगळी असतात. त्यानुसार त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे खासदार नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासन आढावा बैठकीनंतर बोलताना सांगितले. बाधित कुटुंबीयांना अन्न, औषधे, निवारा कमी पडू देवू नका. शासनाकडून तत्काळ मदत करा, अशा सूचना मी प्रशासनाला केल्याचे सुद्धा यावेळी श्री. राणे यांनी सांगितले.
जिल्ह्यात काल (ता. ८) झालेल्या अतिवृष्टीने ओरोस-ख्रिश्चनवाडी येथील सात घरांना मोठा धोका पोहोचला असून अनेक घरांत पाणी घुसले होते. याची पाहणी आज खासदार राणे यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत निलेश राणे, रणजित देसाई, सुप्रिया वालावलकर, दादा साईल यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपस्थित होते. पाहणीनंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जात राणे यांनी नुकसानीचा आढावा घेतला.
ते म्हणाले, ‘‘बाधित झालेल्या सर्व कुटुंबांना प्रशासनाकडून मदत मिळाली पाहिजे. कोणाचीही गैरसोय झाली नाही पाहिजे. पालकमंत्री चव्हाण अधिवेशनात असल्याने ते येवू शकले नाहीत. परंतु, त्यांची उणीव आम्ही भासू देणार नाही. नुकसान झालेल्या सर्व बाबींची नोंद करा. पंचनामे त्वरित करा. स्थलांतरित केलेल्या सर्व नागरिकांची काळजी घ्या. जेवण द्या. लहान मुले, वयोवृध्द यांची विशेष काळजी घ्या. अशा आपत्ती परिस्थितीत प्रशासनाची सेवा दिसून येते. त्यामुळे त्याची खबरदारी घ्या.’’

चौकट
रेस्क्यू टीम वाढवा
निलेश राणे यांनी जिल्ह्यात रेस्क्यू टीम वाढवा. एकच टीम जिल्ह्यात आहे. ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविली जाते. त्या वेळेत नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यात रेस्क्यू टीम वाढवा, अशी मागणी श्री. राणे यांनी केली.

चौकट
शेतीत नाविन्यता आणा
खासदार राणे यांनी यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून शेतीचा आढावा घेतला. यावेळी राणे यांनी शेतीत अधिक उत्पन्न देणारी बियाणे आणा. आंतर शेती पिके घेणारे प्रयोग करा. त्याची मला माहिती द्या. मला सुद्धा यात आवड आहे. त्यानुसार प्रयोग करू, असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.