खेडात मुसळधार, मच्छीमार्केट परिसरात पाणी

खेडात मुसळधार, मच्छीमार्केट परिसरात पाणी

-rat८p५१.jpg -
२४M९५६७९
खाडीपट्ट्यातील अनसपुरे बलदेवाडी येथील मार्गावर मातीचा भराव रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
-rat८p५२.jpg -
P२४M९५६८०
मुसळधार पावसामुळे महामार्गावर सुमारे दोन फूट पाणी होते. यातून मार्ग काढताना वाहनचालक. (छाया : सिद्धेश परशेट्ये, खेड )
---------------------

खेडमध्ये मुसळधार, मच्छीमार्केट भागात पाणी

दापोली मार्ग ठप्प; महामार्गावर वाहतूक धिमी

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता.८ : खेड शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. खेड तालुक्यात गेल्या २४ तासात १५२. ७१ मिलिमीटर तर आत्तापर्यंत एकूण १२६०.१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड नगर पालिकेच्यावतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नद्यांलगतची शेती व वीटभट्ट्या पाण्याखाली गेल्या आहेत.
काल रात्री पावसाचा जोर ओसरला अन्यथा बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले असते. पावसाचा जोर वाढत असून, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युतपुरवठा खंडित झालेला आहे. खेड मटण-मच्छी मार्केट परिसरासह देवणे बंदरभागात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी घुसले. त्यामुळे मच्छीमार्केट परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी सतर्कतेचे पाऊल म्हणून आपल्या दुकानातील माल, अन्य साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरवात केली आहे. प्रशासनाने नदीकिनाऱ्‍यावरील नागरिकांना सावधानता व सुरक्षितता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतीची लावणीची कामे सुरू असली तरी नदीच्या किनाऱ्यावरील शेतजमिनीमध्ये शेतकऱ्‍यांनी शक्यतो दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शहरासह ग्रामीण भागातील लहान-मोठ्या नद्या, ओढे -नाले तुडूंब भरून वाहत आहेत. काल रात्री आठ वाजता जगबुडी नदीने ८.५० मिटरची पातळी गाठली होती. रात्री नऊच्या सुमारास नारंगी नदीच्या पुराचे पाणी खेड-दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरिंगजवळ आल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. आज सकाळपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्यावर मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाकानजीक महामार्गावर अंदाजे दोन फूट पाण्यातून वाहनचालकांना वाहने हाकताना कसरत करावी लागली.
--
जैतापुरात घर कोसळले

तालुक्यातील जैतापूर येथील बाळकृष्ण गणपत रेवणे यांचे घर कोसळून २० हजार रुपयांचे नुकसान झाले. उर्वरित ठिकाणचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. अनसपुरे बलदेवाडी येथील मार्गावर मातीचा भराव रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती तर कर्जी गावातील सलीम अब्बास तांबे यांच्या घरानजीक मातीचा भराव वाहून आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com