कुडाळ तालुक्यात पूरस्थिती कायम

कुडाळ तालुक्यात पूरस्थिती कायम

Published on

swt842.jpg

कुडाळः डॉ. आंबेडकरनगर येथे पूरग्रस्तांना बाहेर काढताना युवक.

कुडाळ तालुक्यात
पूरस्थिती कायम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः तालुक्यामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रविवारी (ता. ७) अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती; मात्र आजपासून पावसाचा जोर कमी झाल्यावर पुराचे पाणी ओसरले तर काही ठिकाणी पूरस्थिती कायम होती.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरातील २० ते २५ घरांना पाण्याचा वेढा कायम होता. रात्री उशिरा डॉ. आंबेडकरनगर येथील एका घरामध्ये अडकलेल्या चार व्यक्तींना स्थानिक युवकांनी पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. पावशी-शेलटेवाडी येथे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून काही ग्रामस्थांना पाण्याबाहेर काढण्यात आले; मात्र काही ग्रामस्थांनी घरातून बाहेर यायला नकार दिला. यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अन्य ठिकाणी पूरस्थिती आटोक्यात असून, तालुक्यात सर्व ठिकाणी वाहतूक सुरळीत असल्याचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.