मालवणात जनजीवन विस्कळीत

मालवणात जनजीवन विस्कळीत

Published on

95803

मालवणात जनजीवन विस्कळीत
मुसळधार कायमः पडझडीमुळे लाखो रुपयांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : गेले दोन दिवस मुसळधार पावसाने तालुक्यास झोडपून काढले. आजच्या दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
बरेच दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी (ता. ७) दमदार हजेरी लावली. सायंकाळनंतर शहरासह, तालुक्यास मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. यात शहरातील बसस्थानक, बाजारपेठ, बुधवारपेठ, देऊळवाडा येथील रस्ते पाण्याखाली गेले. देऊळवाडा येथील पुलानजीक मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक दुपारनंतर बंद करण्यात आली होती. आजच्या दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. मुसळधार पावसामुळे मसुरे-देऊळवाडा येथील शांताराम परब यांच्या घरावर झाड कोसळून ८० हजार रुपयांचे, हिवाळे येथील सत्यवान धुरी यांच्या दुकानात पाणी शिरल्याने ५० हजार रुपयांचे, सुकळवाड येथील नरेंद्र पाताडे यांच्या घरातील खत व अन्य साहित्याचे ९ हजार रुपयांचे, देवबाग येथील नीलकंठ गावकर यांच्या घराचे ९ हजार ३०० रुपयांचे, कांदळगाव येथील सोनाजी वारंग यांच्या घरातील धान्य भिजून ११ हजार रुपयांचे, कुमामे येथील जयवंत घाडीगावकर यांच्या गणपती कारखान्याचे २ लाख ५० हजार रुपयांचे, शहरातील रेवतळे येथील शरद कांबळी यांच्या घरावर झाड कोसळून १३ हजार २०० रुपयांचे, खांद येथील सुनीता राऊळ यांच्या पडवीचे छप्पर कोसळून ३ हजार रुपयांचे, राठीवडे येथील प्रभाकर शेट्ये यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने २३ हजार रुपयांचे, वराड येथील उत्तम आंबेरकर यांच्या घरात पाणी घुसल्याने ८५ हजार रुपयांचे, वराड येथील साईनाथ सरमळकर यांच्या घरात पाणी शिरल्याने ९० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका किल्ले सिंधुदुर्गलाही बसला आहे. किल्ल्यातील सर्व विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. शिवाय समुद्री लाटांच्या माऱ्यामुळे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील जेटी खचली असून, त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष पुरवून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी किल्ल्यातील रहिवाशांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.