आंबेरी पुलावरुन वृध्द गेला वाहून

आंबेरी पुलावरुन वृध्द गेला वाहून

Published on

आंबेरी पुलावरुन
वृध्द गेला वाहून
सकाळ वृत्तसेवा
माणगाव, ता. ८ ः परिसरात अतिवृष्टीमुळे निर्मला नदीला आलेल्या पुरात आंबेरी पुलावरुन माणगाव खालची बेनवाडी येथील वृध्द वाहून गेला. दत्ताराम लाडू भोई (वय ६०) असे त्यांचे नाव आहे. ही घटना काल (ता.७) दुपारी अडीज वाजता घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कीः दत्ताराम भोई घरात एकटेच राहतात. बायको आजारी असल्याने ती घावणाळे येथे माहेरी राहते. त्यांना मुले नाहीत. दत्ताराम भोई यांना दररोज निर्मला नदीला लागून असलेल्या म्हसोबा मंदिरात बसण्याची सवय होती. दररोज प्रमाणे ते काल सकाळी मंदिरात बसून होते. अतिवृष्टी होत असल्याने त्यांना ग्रामस्थांनी सकाळी १० च्या सुमारास घरी सोडले. परंतु, पुन्हा दुपारी ते मंदिरात येऊन बसले. पावसाचा जोर वाढल्याने मंदिराला पाण्याने वेढा घातला. त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी गर्दी केली. परंतु, पूरस्थिती असल्याने शोधणे कठीण झाले होते. घटनास्थळी माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल एस. एस. भोई, तलाठी एस. व्ही. शेणई, मंडळ अधिकारी नार्वेकर उपस्थित होते. त्यांचा आज दुसऱ्या दिवशीही शोध लागलेला नाही. त्यांचा रेस्क्यू टीमद्वारे अद्याप शोध सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.