मिठबांव, तांबळडेग वाचनालयांना पुस्तके

मिठबांव, तांबळडेग वाचनालयांना पुस्तके

95888

मिठबांव, तांबळडेग
वाचनालयांना पुस्तके
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ११ः तालुक्यातील मिठबांव येथील मुक्तद्वार सागर वाचनालयाला आचरा (ता. मालवण) येथील रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरच्यावतीने पुस्तके भेट देण्यात आली. आपल्याकडे असलेली ग्रंथसंपदा इतर वाचनालयांना द्यावी व त्यांच्या ज्ञानदानाच्या कक्षा रुंदाव्यात, या हेतूने ही पुस्तके देण्यात आल्याचे सांगण्यात आले. ग्रंथालय भेट आणि पुस्तके भेट उपक्रमांतर्गत तांबळडेग येथील ग्रंथालयाला दोनशे पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, सहकार्यवाह वीरेंद्र पुजारे, सदस्य भिकाजी कदम, ग्रंथपाल विनिता कांबळी, महेश बापर्डेकर, स्वप्नील चव्हाण, मुक्तद्वार सागर वाचनालय अध्यक्ष दिगंबर येरागी, उपाध्यक्ष प्रभाकर राजम, सचिव रामचंद्र सारंग, खजिनदार रमाकांत सनये, विष्णू धावडे, शंकर हडीकर, विष्णू निवतकर, गजानन सारंग, दीपक कांदळगावकर, स्वाती येरागी, वर्षा राजम, ग्रंथपाल भावना मालडकर, समृद्धी धुरी, माधवी प्रभू, आकांक्षा सारंग, शुभदा धुरी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com