ओरोस-ख्रिश्चनवाडीतील ''त्या''कुटुंबांना भाजपतर्फे मदतीचा हात

ओरोस-ख्रिश्चनवाडीतील ''त्या''कुटुंबांना भाजपतर्फे मदतीचा हात

Published on

95892

ओरोस-ख्रिश्चनवाडीतील ''त्या'' कुटुंबांना मदत
भाजपतर्फे जीवनाश्‍यक वस्तूंची भेट; रोटरी क्लबकडून दिलासा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ ः मुसळधार पावसाचा ओरोस ख्रिश्चनवाडी येथील आठ कुटुंबांना मोठा फटका बसला असून घरे जमिनदोस्त झाल्यामुळे त्यांचा संसार मातीखाली गाडला गेला आहे.
या कुटुंबांना भाजपचे अध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, सुप्रिया वालावलकर, रोटरीचे अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस, उदय जांभवडेकर आदी मान्यवरांनी मदतीचा हात दिला.
ओरोस ख्रिश्चनवाडीतील काशीराम भगवान भोगले, सुरेश शिवराम भोगले, फ्रान्सिस घाब्रीयल फर्नांडिस, फ्रान्सिस बावतीस फर्नांडिस, बेनेत ऑगस्तीन फर्नांडिस, शरद तातोबा परब, राधाबाई विशाल भोगले, प्रभावती शांताराम भोगले या आठ कुटुंबांची घरे जमीनदोस्त झाली. यामुळे २१ जण बाधित झाले. भर पावसात ना घर, ना कपडे, ना अन्नधान्य, अशी त्यांची परिस्थिती झाली. या कुटुंबांना सावरण्यासाठी या मान्यवरानी एकत्र येत प्रति व्यक्ती जीवनावश्यक वस्तू, कपडे, अंथरूण-पांघरून यासाठी प्रत्येक व्यक्ती पाच हजार रुपये अशी रोख स्वरूपातील मदत या कुटुंबातील २१ व्यक्तींना दिली. ही मदत भाजपच्यावतीने करण्यात आली. याशिवाय भाजपचे निलेश राणे यांनी संबंधितांना भेट देवून मदत केली होती. यासोबत रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्यावतीने गरजूंना गॅस शेगडी व संसारपयोगी भांडी यांचीही मदत केली जाईल, असेही सांगण्यात आले. भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी सोमवारी पूरबाधितांची भेट घेत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही या पुर परिस्थीची दखल घेत अधिवेशन काळातून संपर्क साधला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या कठीण प्रसंगी मदतकार्य करावे व या कुटुंबांना धीर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री चव्हाण यांनी दिल्याचेही श्री. सावंत म्हणाले. यावेळी ओरोसमधील मान्यवर नागरिक, पूरग्रस्त मंडळी तसेच रोटरीचे नवीन बांदेकर, अरुण मालणकर आदी उपस्थित होते.
-----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.