लोवले ग्रामपंचायत

लोवले ग्रामपंचायत

Published on

लोवले ग्रामपंचायत
परिसरात वृक्षारोपण

संगमेश्वर, ता. ९ ः तालुक्यातील लोवले ग्रामपंचायत आणि परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. लोवले ग्रामपंचायत आणि नवनिर्माण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सरपंच ऋतुजा कदम, प्राचार्य डॉ. संजना चव्हाण, ग्रामसेवक अभिनंदन पाताडे, राष्ट्रीय सेवा विभागाचे प्रमुख प्रा. अनिल नेमण, प्रा. तेजस्विनी सावंत, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत परिसरातील जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच लोवले ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना वृक्ष वाटप करण्यात आले.
---------
ब्राह्मण सहायक संघाचे
शिष्यवृत्तीसाठी आवाहन

चिपळूण : चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघाकडून गरजू आणि वार्षिक उत्पन्न कमी असलेल्या पालकांच्या शाळा आणि महाविद्यालात शिक्षण घेत असलेल्या चिपळूणमधील मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी संघाकडे विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावे लागतात. 2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठीही संघ शिष्यवृत्ती देणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असलेले अर्ज संघाच्या कार्यालयात 8 जुलै 2024 पासून उपलब्ध असतील. अर्ज एक आठवड्याच्या आत पूर्ण भरून कार्यालयाकडे जमा करावेत. माहिती पूर्ण नसेल किंवा विद्यार्थी जेथे शिक्षण घेत आहे त्या संस्थेच्या प्रमुखाची सही नसेल तर संस्था अर्ज नाकारू शकेल. संस्थेत अर्ज मिळण्याचा कालावधी 8 ते 20 जुलै असेल. त्यानंतर अर्ज मिळणार नाहीत. पालकांना आपल्या उत्पन्नाचा दाखला अर्जाला जोडावा. चित्पावन संघ मुंबई या संस्थेचे शिष्यवृत्ती अर्ज फक्त कोकणस्थ ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघ कार्यालयात उपलब्ध आहेत. ब्राह्मण सभा मुंबई यांच्याकडून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या ब्राह्मण समाजातील सर्व विद्यार्थ्यांसाठी काही दिवसांनी अर्ज उपलब्ध होतील, अशी माहिती ब्राह्मण सहाय्यक संघ कार्यवाह यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.