डिगसमध्ये शेती नुकसानीची आमदार नाईकांकडून पाहणी

डिगसमध्ये शेती नुकसानीची आमदार नाईकांकडून पाहणी

Published on

95889

डिगसमध्ये शेती नुकसानीची
आमदार नाईकांकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवून डिगस गावात शेतीचे नुकसान झाले. आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी (ता. ८) त्याठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, अमरसेन सावंत, बबन बोभाटे, अतुल बंगे, सचिन काळप, गुरू गडकर, अमित राणे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार नाईक यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करत पंचनामा आणि नुकसानभरपाईबाबत चर्चा केली. कृषी अधिकाऱ्यांनी ते मान्य केले. शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांशी संपर्क करून नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.