सोनवड़ेतील घोगळे कुटुंबीयांना नीलेश राणे यांच्याकडून मदत

सोनवड़ेतील घोगळे कुटुंबीयांना नीलेश राणे यांच्याकडून मदत

Published on

95908

सोनवडेतील घोगळे कुटुंबीयांना
नीलेश राणे यांच्याकडून मदत
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ः गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. अनेक गावांना पावसाचा फटका बसला. सोनवडे तर्फ हवेली येथील रवींद्र वामन घोगळे यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले. याबाबत माहिती मिळताच भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घोगळे कुटुंबीयांसाठी मदत पाठवून दिली. यावेळी महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपलक्ष्मी पडते, मंडल अध्यक्ष दादा साईल, सरचिटणीस देवेंद्र सामंत, शक्तिकेंद्र प्रमुख नागेश परब, बूथ कमिटी अध्यक्ष सुधीर धुरी, ग्रामपंचायत सदस्य समीर धुरी, प्रमोद धुरी, कैलास यादव, सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.