सीसीटीव्ही बसवण्याची मागणी

सीसीटीव्ही बसवण्याची मागणी

Published on

-rat९p१६.jpg-
२४M९५८६५
रत्नागिरी : नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे सीसीटीव्ही संदर्भातील निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते तन्मय दाते.
------------
पुतळ्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : रत्नागिरी शहराची वाढ झपाट्याने सुरू आहे. विविध विकासकामांसह शहरात नवनव्या इमारती उभ्या राहत आहेत. शहरात राष्ट्रीय महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. रत्नागिरी शहरात काही पुतळे जुने असून काही नव्याने उभारण्यात आले आहेत. हे पुतळे शहरासाठी भूषण असून शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी महत्वाचे आहेत; परंतु तेथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, अशी मागणी येथे जागरूक नागरिक तन्मय दाते यांनी केली आहे. रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे या संदर्भातील निवेदन दाते यांनी आज सुपूर्द केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.