सावंतवाडी विधानसभा भाजपलाच हवा

सावंतवाडी विधानसभा भाजपलाच हवा

Published on

95917

सावंतवाडी विधानसभा भाजपलाच हवा
बैठकीत ठरावः प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः सावंतवाडी विधानसभा मतदार संघ हा आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपला मिळावा, असा एकमुखी ठराव सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सरचिटणीस, सर्व मंडल अध्यक्ष तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आज भाजप तालुका कार्यालयात विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी झालेल्या चर्चेतून सर्वांमध्ये ही मागणी करण्यात आली. या बैठकीस जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक तथा जिल्हा निमंत्रित सदस्य मनोज नाईक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा चिटणीस एकनाथ नाडकर्णी, आंबोली मंडल अध्यक्ष रविंद्र मडगावकर, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, वेंगुर्ले मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर, दोडामार्ग मंडल अध्यक्ष सुधीर दळवी, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पप्पू परब, सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.