मराठा मोर्चातर्फे गुणवंताचा सत्कार

मराठा मोर्चातर्फे गुणवंताचा सत्कार

मराठा क्रांती मोर्चातर्फे
गुणवंतांचा सन्मान

चिपळूण ः मराठा क्रांती मोर्चातर्फे चिपळूणमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शहरातील अतिथीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. युपीएससी परीक्षेत प्रावीण्यप्राप्त समर्थ शिंदे, इंडियन नेव्ही नियुक्त हरिज्ञा शिंदे, मर्चंट नेव्ही नियुक्त तेजस शिंदे, बीएचएमएस डॉ. वरूण चव्हाण, नेपाळ येथील इंटरनॅशनल डान्स स्पर्धेत यश संपादन करून श्रीलंका येथील डान्स स्पर्धेत निवड झाल्याबद्दल सिया शिर्के, काठमांडू येथील डान्स स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त आराध्या चव्हाण, काव्या चव्हाण, भक्ती जाधव, पूर्वा जाधव, रियांशी, महाराष्ट्र राज्य ओपन करोगी तायक्वांदो क्योरूगी पुमास चॅम्पियनशिप २०२४ गोल्ड मेडल प्राप्त श्रेया मनीष सुर्वे, नवोदित गायिका प्रगती पवार, रक्तदाते शशिकांत चव्हाण आदींना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला माजी आमदार सदानंद चव्हाण, रमेश कदम, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सचिन कदम, उद्योजक प्रकाश देशमुख, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, सतीश मोरे, कपिल शिर्के, अविनाश शिंदे आदी उपस्थित होते.
-------

बुरंबी रस्त्याशेजारील
धोकादायक झाडे

संगमेश्वर ः संगमेश्वर-कोल्हापूर राज्यमार्गावरील बुरंबी येथील विश्वनाथ सावंत यांच्या घराशेजारील रस्त्यालगत असणारे आंब्याचे झाड कोणत्याही वेळी रस्त्यावर पडण्याच्या स्थितीत आहे. दोन्ही झाडे पडण्याच्या स्थितीत आणि रस्त्याला पडलेले खड्डे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाला झाड धोकादायक असल्याचे सांगितले होते; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे अजूनही गांभीर्याने लक्ष दिले नाही. कोणत्याही प्रकारचा अपघात अथवा दुर्घटना घडण्याअगोदर योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
--------
फुणगुस शाळेजवळ
रस्त्याला मोठे भगदाड

संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस मराठी शाळेजवळ रस्त्याला मोठे भगदाड पडले असून, पहिल्याच पावसात झालेल्या या दुरवस्थेमुळे नाराजी व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करावी. पावसाळ्यात एखादा माणूस आजारी झाला तर दवाखान्यात नेणे कठीण झाले आहे. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याबाबत खासदार, पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
-----------

लाडकी बहीण योजनेची
भडकंबामध्ये जागृती

साखरपा ः भडकंबा गावात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यात आली आहे. ही योजना घरोघरी पोचवून जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी हा प्रचार करण्यात येत आहे. नवालेवाडी, बाईतवाडी, पाष्टेवाडी, बौद्धवाडी, पेठवाडी, मुस्लिमवाडी येथेही बैठका घेऊन जागृती करण्यात आली. पुढील दोन दिवसात अर्ज भरून घेणे आणि ते ऑनलाइन करणे ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि उपसरपंच बापू शिंदे यांनी दिली आहे. बैठकांदरम्यान माजी सरपंच शेखर आक्टे, सरपंच प्रतीक्षा नवाले, ग्रामपंचायत सदस्य केतन दुधाणे, संतोष जामसंडेकर, सामाजिक कार्यकर्ते अतुल शिंदे, माजी सरपंच कमलेश मावळणकर, अजमीना रमदुल, अंगणवाडी सेविका वेदिका कनावजे, ममता दुधाणे, ग्रामसेवक संतोष कांबळे आदी उपस्थित होते.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com