कर्दे शाळेत आनंदोत्सव

कर्दे शाळेत आनंदोत्सव

Published on

-rat९p१८.jpg-
२४M९५८६७
दापोली ः कर्दे शाळेत प्रणव देवघरकर, भूमी मळेकर यांचे अभिनंदन करताना आण्णासाहेब बळवंतराव.
------------
कर्दे शाळेत आनंदोत्सव

गावतळे ः शिष्यवृत्ती परीक्षेत प्रणव देवघरकर व भूमी मळेकर यांचे धवल यश, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक आणि शाळेने शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल कर्दे शाळेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रणव देवघरकरने दापोली तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात प्रथम, भूमी मळेकरने १०वा क्रमांक पटकावला. या दोघांनाही उत्कृष्ट शिष्यवृत्ती मार्गदर्शक वैजयंत देवघरकर यांचे मार्गदर्शन लाभले. शतक महोत्सव आणि मुख्यमंत्री माझी शाळा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाल्याच्या उत्साहात असतानाच दोन विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्ती यादीत झळकल्यामुळे कर्दे गावातील सर्व ग्रामस्थ, पालक, शिक्षकांचा आनंद द्विगुणित झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.