नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांशी आमदार साळवींचा संवाद

नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांशी आमदार साळवींचा संवाद

Published on

-rat९p३७.jpg -
२४M९५९५६
राजापूर ः व्यापाऱ्यांशी संवाद साधताना आमदार राजन साळवी.
---------

आमदार साळवी यांचा व्यापाऱ्यांशी संवाद

अतिवृष्टीमुळे नुकसान ; पूर ओसरल्याने दिलासा

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये तालुक्यातील अर्जुना-कोदवली नद्यांना पूर येऊन पुराच्या पाण्याने शहराला वेढा घातला होता. अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पुराचे पाणी घुसून नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची आमदार राजन साळवी यांनी आज पाहणी केली. त्यांनी व्यापाऱ्‍यांशी संवाद साधत नुकसानीची चौकशी करत त्यांना दिलासा दिला.
या वेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय पवार, दिलीप चव्हाण आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अतिवृष्टीमध्ये तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना-कोदवली नद्यांना पूर आला होता. या पुराचे पाणी दुकानांमध्ये घुसले होते. तब्बल दहा तासानंतर पूर ओसरला तरी सोमवारी (ता. ८) दिवसभरातील बहुतांशवेळ शिवाजीपथ रस्त्यावरील दुकाने बंद होती. अनेक व्यापारी दुकानामध्ये साचलेला चिखल आणि साफसफाई करण्यामध्ये गुंतले होते. मंगळवारी (ता. ९) सकाळी नुकसानग्रस्त भागाची आमदार साळवी यांनी भेट देऊन पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.