दापोली तालुक्यात प्रणव, प्रणित प्रथम

दापोली तालुक्यात प्रणव, प्रणित प्रथम

Published on

-rat९p३४.jpg -
२४M९५९५३
प्रणव देवघरकर
-rat९p३५.jpg -
२४M९५९५४
प्रणित किरवे
---------

दापोली तालुक्यात प्रणव, प्रणित प्रथम

सकाळ वृत्तसेवा
हर्णै, ता. ९ ः पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत दापोली तालुक्यातून १९ पैकी १५ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधील असून कर्दे शाळेचा प्रणव देवघरकर व कुडावळे नं. १ शाळेचा प्रणित किरवे या दोघांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. ओणनवसे पाटील शाळेतील प्रणाली टेमकरने तालुक्यात द्वितीय आणि गावरई शाळेतील परी प्रजापती हिने तालुक्यात तृतीय क्रमांक पटकवला आहे. गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, विस्तार अधिकारी बळीराम राठोड, रामचंद्र सांगडे, पद्मन लहांगे यांनी तसेच सर्व केंद्रप्रमुखांनी कर्दे, गावरई, कादिवली, कुडावळे, चंद्रनगर, हर्णै, ओळगाव, पंचनदी, सातेरेतर्फ नातू, राजापूर या शाळांमध्ये भेट देत सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे गावरई शाळेतील तीन आणि कर्दे शाळेतील दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. व्हिजन दापोलीचे सचिव शशिकांत बैकर आणि सदस्य वैजयंत देवघरकर या मुख्य समिती सदस्यांच्या शाळेत अनुक्रमे तीन आणि दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. व्हिजन अध्यक्ष धनंजय शिरसाट यांच्या केंद्रातील कुडावळे आणि कादिवली शाळेतील प्रत्येकी एक विद्यार्थ्याने प्रावीण्य मिळवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.