-कुर्धेतील लोखंडी साकव धोकादायक

-कुर्धेतील लोखंडी साकव धोकादायक

-rat९p३९.jpg, rat९p४०.jpg -
२४M९५९६२, P२४M९५९६३
पावस ः कुर्धे गावामधून वाहणाऱ्या नदीवर बांधण्यात आलेल्या लोखंडी साकवाची दयनीय अवस्था झाली आहे. कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
----------

कुर्धेतील लोखंडी साकव धोकादायक

कोसळण्याची शक्यता ; ग्रामसेवक, तलाठ्यांकडून तातडीने पाहणी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ९ ः रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे नदीवरील लोखंडी साकव धोकादायक बनला असून, कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. या परिसरातील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांचा शाळेत जाण्याचा व इतर मार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तातडीने लोखंडी साकवाची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या गावातील फडकेवाडी, खोताचीवाडी, गणेशगुळेचा काही भाग या भागातील अनेक शालेय विद्यार्थी प्राथमिक शाळा व हायस्कूल नदीपलीकडे असल्याने पावसाळ्यामध्ये या लोखंडी साकवाच्या माध्यमातून ये-जा करत असतात. त्याचबरोबर ग्रामस्थ या साकवाचा वापर करत असतात. चार वर्षांपूर्वी या लोखंडी साकवाची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या रंगरंगोटी व इतर गोष्टींकडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दुर्लक्ष केल्यामुळे हा साकव कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. या साकवावरील अनेक हुक गंजलेल्या स्थितीत असल्यामुळे काही भाग त्या पॅनेलमधून सुटलेला आहे. त्यामुळे हा साकव मोडकळीस आल्यास या परिसरातील लोकांचा व शालेय विद्यार्थी यांचा पावसाळ्यामध्ये संपर्क तुटण्याची शक्यता आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर ग्रामसेवक व तलाठी यांनी साकवाची पाहणी केली. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याचा वापर केला जात नाही; मात्र पावसाळ्याचे तीन-चार महिने या लोखंडी साकवाचा वापर केला जातो; मात्र याची दुरुस्ती न झाल्यास कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
--------
दुरुस्तीची मागणी
कुर्धे नदीवरील लोखंडीसाकव धोकादायक बनला असल्याने कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मार्ग बंद झाल्यास विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल होणार आहे. त्यामुळे लोखंडी साकवाची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com