६७ कोटीचे सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वाटुळमध्ये

६७ कोटीचे सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वाटुळमध्ये

वाटुळमध्ये सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

अधिवेशनापूर्वी मंजुरी शक्य ; सार्वजनिक आरोग्य विभागाकडे प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : वाटुळ (ता. राजापूर) येथील १०० खाटांच्या सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी मंजुरी मिळणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून हे हॉस्पिटल होणार आहे. सुमारे ६७ कोटींचा हा प्रकल्प असून ५ एकर जागेत तो होणार आहे. दोन्ही जिल्ह्याच्या हद्दीवर हे हॉस्पिटल होणार असल्याने दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयावरील रुग्णांचा ताण कमी होणार आहे. सामंत यांच्या प्रयत्नामुळे ४ दिवसात मंजुरी मिळणार असल्याचे समजते.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर वाटुळ (ता. राजापूर) येथे मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल होणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा ताण कमी होणार आहे. शासनाच्या आरोग्य संचालकांना त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. वाटुळ येथील या १०० खाटांच्या सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा हा प्रस्ताव त्यांनी अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभागाला सादर केला आहे. पालकमंत्री उदय सामंत त्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे चार दिवसात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला लागणाऱ्या आकृतीबंधानुसार उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या, अतिरिक्त निर्माण करावी लागणाऱ्या ११६ पदांची निर्मिती केली जाणार आहे. निर्माण होणाऱ्या पदावर येणारा मासिक व वार्षिक खर्च ४ कोटी २५ लाख १७ हजार २०० अपेक्षित आहे. लांजा तालुक्याची १ लाख ३६ हजार ९४२, संगमेश्वर तालुक्याची १ लाख ९८ हजार ३४३ एवढ्या लोकसंख्येला हॉस्पिटल उपयुक्त आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ला लागून हे रुग्णालय होणार आहे.
वाटुळ येथे ६७ कोटीचा हा प्रकल्प ५ एकर जागेत होणार आहे. यामध्ये मुख्य इमारत आणि निवासी इमारत बांधकामाचा खर्च ३० कोटीच्या दरम्यान आहे. यंत्रसामग्री ११ कोटी ३६ लाख ५० हजार, चार रुग्णवाहिका १ कोटी, वाहनांच्या इंधन, वंगण आदींवरील खर्च वर्षाला ५ लाख आहे. औषध व उपकरणे, साधनसामग्री, भांडार व इतर खर्च ४ कोटी ५३ हजार ७९ एवढा अपेक्षित आहे. उबाठाचे स्थनिक आमदार राजन साळवी हे देखील त्याचा अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. त्याला पालकंमंत्री यांची जोड मिळाल्याने येत्या चार दिवसांमध्ये पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी याला मंजुरी मिळणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
---------------
आधुनिक उपचार शक्य
राजापूर तालुका रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द आहे. वाटुळ येथे हे हॉस्पिटल होणार असल्याने दोन्ही जिल्ह्याला याचा फायदा होणार आहे. अत्याधुनिक सुविधांमुळे आधुनिक उपचार रुग्णांना मिळणार आहेत.
-----
दृष्टिक्षेपात
* पाच एकरमध्ये हॉस्पिटल
* ११६ पदांची होणार निर्मिती
* मुख्य, निवासी इमारतीसाठी ३० कोटी
* दोन्ही जिल्ह्यांना फायदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com