रंगभरण स्पर्धेमध्ये वेदांत तवटेचे यश

रंगभरण स्पर्धेमध्ये वेदांत तवटेचे यश

96047

रंगभरण स्पर्धेमध्ये
वेदांत तवटेचे यश
सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. ११: श्रीमती मनोरमा चौधरी यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुर येथे विद्यार्थ्यांकरिता चित्रभरण स्पर्धा, दंत चिकित्सा व नेत्र चिकित्साचे आयोजन केले होते.
रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रंगभरण चित्रकला स्पर्धेत पाचवी ते सातवी या गटात वेदांत तवटे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. वेदांत हा श्री भगवती हायस्कूल मुणगेच्या कला शिक्षिका गौरी तवटे व पदवीधर शिक्षक सचिन तवटे यांचा मुलगा आहे. या स्पर्धेत देवगड ते दोडामार्गपर्यंतच्या १५७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या हस्ते मनोरमा चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, संदीप साळसकर, नेरुर सरपंच भक्ती घाडीगावकर, वसुंधरा केंद्राचे व्यवस्थापक सतीश नाईक, डॉ. मयुरी ठाकूर, डॉ. जोशी, सिंधुदुर्ग न्यायालयाचे निवृत्त रजिस्ट्रार मटकर उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादी शरद गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमित सामंत व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com