डेंगी प्रतिबंधासाठी घरांची तपासणी

डेंगी प्रतिबंधासाठी घरांची तपासणी

Published on

- rat९p३१.jpg
२४M९५९१४
- खराब टायर्सची विल्हेवाट लावताना आरोग्य विभागाचे कर्मचारी.
-------------

डेंगी प्रतिबंधासाठी साडेसात हजार घरांची तपासणी

आरोग्य विभागाचा पुढाकार; तापाचे १५५३ रुग्ण, डेंगी रुग्णांची संख्या १५५ वर

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १०ः जिल्ह्यात डेंगी प्रतिबंधासाठी आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली असून, आतापर्यंत डेंगी रुग्णांची संख्या १५५ वर पोचली आहे. सर्वेक्षणात साडेसात हजार घरांची तपासणी करण्यात आली असून १ हजार ५५३ तापाचे रुग्ण आढळले. त्यांची तपासणी करून घरीच त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
जुलै महिना हा डेंगी प्रतिरोधक महिना म्हणून राबविला जात असल्यामुळे १ जुलैपासून सर्व घरांना भेटी देऊन डास अळी असलेली भांडी तपासणे, त्यामध्ये टेमिफोसचे द्रावण टाकून ती भांडी रिकामी करणे तसेच ताप रुग्णाचा रक्तनमुना घेऊन गृहितोपचार करणे, पाणी साचलेली डबकी वाहते करणे किंवा त्यात गप्पी मासे सोडणे, डास उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, डेंगी आजाराबद्दल आरोग्य शिक्षण या मोहिमेत समाविष्ट आहे. १ ते ८ जुलैपर्यंत झालेल्या सर्वेक्षणात ७ हजार ५९२ घरांमध्ये २६ हजार ८६८ पाणीसाठे असलेली भांडी तपासण्यात आली. त्यापैकी ४७६ घरांमध्ये पाणी असलेल्या १ हजार ५९ भांड्यामध्ये डासांची अळी आढळली. या परिसरात ९ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. आतापर्यंत ४ हजार ९६ घरांमध्ये धूरफवारणी केली तसेच १ हजार ५५३ ताप रुग्णांची रक्तनमुना तपासणी करून त्यांच्यावर गृहितोपचार केले गेले. ही मोहीम ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी सांगितले. डेंगी झालेल्या व्यक्तीला डास चावला तर रोग्याच्या रक्तातील डेंगी विषाणू त्या डासाच्या शरीरात शिरतात आणि डेंगीचा प्रादुर्भाव होतो. डेंगी रोगाचा प्रसार थांबवयाचा असल्यास एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून मोहीम राबवण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून सुचवण्यात आलेल्या उपाययोजना राबवाव्यात आणि डेंगीवर नियंत्रण आणण्यात मदत करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी केले आहे.
-------
डेंगीची लक्षणे

डेंगी झालेल्यांना तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी व सांधेदुखी, थंडी वाजून ताप येणे, उलट्या होणे, डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे अशी लक्षणे दिसतात. ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो. अंगावर पुरळ, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, घाम येऊन अंग गार पडणे, त्वचेखाली, नाकातून रक्तस्राव होणे व रक्ताची उलटी होणे. रक्तमिश्रित किंवा काळसर रंगाचे शौचास होणे, पोट दुखणे, रक्तदाब कमी होणे अशी लक्षणे दिसतात. काहीवेळी रक्तजलाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण अत्यवस्थ होतो.
------
घ्यावयाची काळजी
* पाणी साठवण्याची भांडी घासून कोरडी करावी
* एक दिवस कोरडी ठेवून पाणी भरावे
* भरलेल्या टाक्यांना घट्ट झाकण बसवा
* घरातील फ्लॉवरपॉट, कूलर व फ्रिजचा ट्रे स्वच्छ करा
* भंगार, प्लास्टिक बाटल्या, करवंट्या, खराब टायर्सची विल्हेवाट लावा
* ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
--------
डेंगी रुग्णांची संख्या
*तालुका* डेंगी
मंडणगड - ०
दापोली - १
खेड - ०
गुहागर - ६
चिपळूण - २
संगमेश्वर - ६
रत्नागिरी - ११९
लांजा - ७
राजापूर - १४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.