माता-पित्याने केले मुलाचे मरणोत्तर देहदान

माता-पित्याने केले मुलाचे मरणोत्तर देहदान

Published on

माता-पित्याने केले
मुलाचे मरणोत्तर देहदान

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडावे या भूमिकेतून सर्वंभ मनोज पाडावे याचे मरणोत्तर देहदान करण्यात आहे. सर्वंभचे काल अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्याच्या आई-वडिलांनी घेतलेला हा निर्णय सर्वांनाच भारावून टाकणारा ठरला.
मुंबई जिल्हाअंतर्गत विलेपार्ले तालुक्यातील गुरूबंधू व मुंबई उपपीठ व्यवस्थापक मनोज मनोहर पाडावे यांचा सर्वंभ हा मोठा मुलगा. तो कुटुंबासह भागीरथी स्मृती सोसायटी, विलेपार्ले पूर्व, जिल्हा मुंबई येथे राहात होता. त्याचे ९ जुलैला सकाळी अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. सर्वंभच्या जाण्याने पाडावे कुटुंबावर खूपच मोठा आघात झाला होता; परंतु मनोज पाडावे व त्यांची पत्नी सौ. मानसी यांनी मुलाचा देह मुंबईतील नायर हॉस्पिटलला सुपूर्द केला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी भाविकांना मरणोत्तर देहदान करण्याचे आवाहन केले होते. त्याला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे झालेले हे ५८वे मरणोत्तर देहदान आहे. या निर्णयाबद्दल गुरूबंधू मनोज पाडावे आणि परिवार यांचे संपूर्ण संप्रदायाच्यावतीने आभार मानण्यात आले. त्यांच्या मुलाच्या पुण्यात्म्यास उत्तम गती व शांती लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली. नायर हॉस्पिटल येथे देहदान करताना वडील मनोज पाडावे, आई मानसी, भाऊ ऋग्वेद, महेंद्र पाडावे, ममता राणे, रवीदास राणे, भिकाजी पाडावे, यशवंत पाडावे यांच्यासह शंकर नाईक, सुनील परब, सुधीर परब, वैभव चव्हाण आदी उपस्थित होते तसेच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे मुंबईतील पदाधिकारी, कार्यकर्ते, भक्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.