वाडीवस्तीवर पक्ष संघटना मजबूत करा

वाडीवस्तीवर पक्ष संघटना मजबूत करा

- rat१०p५.jpg-
P२४M९६०८९
राजापूर ः भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना नीलेश राणे.

वाडीवस्तीवर पक्ष संघटना मजबूत करा

नीलेश राणे ः तळागाळात पोहचून कामे मार्गी लावा, राजापुरात मेळावा

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १० : भाजपच्या कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहचून त्यांची कामे करा, ती मार्गी लावा तरच पक्ष आणि पक्ष संघटन अधिक बळकट आणि भक्कम होईल. तसे झाले तर ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत आपली हक्काची सत्ता असेल हे लक्षात ठेवा. हक्काचा खासदार म्हणून नारायण राणे हे कार्यकर्त्यांच्या मागे ठाम उभे आहेत. त्यामुळे विकासाची तुम्ही चिंता करू नका ते आमच्यावर सोडा; मात्र गावागावात आणि वाडीवस्तीवर पक्ष संघटना, बूथ मजबूत करा, असे आवाहन भाजप नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी केले.
भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा संपन्न झाला. या वेळी त्यांनी वरील प्रतिपादन केले. या वेळी व्यासपीठावर प्रदेश सचिव शिल्पा मराठे, विधानसभा क्षेत्रप्रमुख उल्का विश्वासराव, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, सरचिटणीस अनिल करगुंटकर, तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, भास्कर सुतार आदी उपस्थित होते. या वेळी राणे म्हणाले, मी आपल्या हक्काचाच माणूस आहे. कधीही साद घाला; मात्र भविष्यात आपल्याला पक्ष संघटना अधिक बळकट करताना विकासाचा नवा अध्याय या भागात निर्माण करायचा आहे. खासदार नारायण राणे यांच्याप्रमाणे जनतेचे सेवक म्हणून न थकता काम करा. भविष्यात रोजगारासाठी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प मार्गी लागला पाहिजे. ही मागणी खासदारांच्या माध्यमातून मार्गी लागेल. राज्याच्या उद्योगमंत्र्यांनीही आता हा प्रकल्प राजापुरात व्हावा यासाठी राज्याच्यावतीने केंद्राला पत्र द्यावे.

विधानसभेची मोर्चेबांधणी
लोकसभा निवडणुकीनंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राजापुरात हा मेळावा झाला. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी करण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्यातील उत्साहवाढीस मदत मिळत असल्याच्या भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com