राजापुरातील पूरसमस्येवर मार्ग काढणार

राजापुरातील पूरसमस्येवर मार्ग काढणार

Published on

-rat१०p१३.jpg
P२४M९६११२
ः राजापूर ः पूरस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना खासदार नारायण राणे. या वेळी उपस्थित नीलेश राणे, अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, वैशाली माने, शीतल जाधव, प्रशांत भोसले, संदीप मालपेकर आदी.
----------------

राजापुरातील पूर समस्येवर मार्ग काढणार

नारायण राणेंची ग्वाही ; नागरिक, व्यापाऱ्यांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १० : राज्याचे महसूलमंत्री असताना आपण राजापुरात येणाऱ्‍या पुरापासून नागरिक व व्यापाऱ्‍यांची सुटका व्हावी म्हणून गाळ उपसा करण्यासाठी निधी दिला होता. त्यामुळे राजापुरातील पूर, पूररेषा, लोकांसह व्यापाऱ्यांच्या समस्या याबाबत आपल्याला पूर्ण माहिती आहे. आता राजापूरवासियांची या पुराच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका व्हावी यासाठी लक्ष घालू. यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यासाठी उच्चस्तर अधिकाऱ्‍यांची बैठक घेऊन त्यातून सकारात्मक मार्ग काढू, अशी ग्वाही खासदार नारायण राणे यांनी दिली.
वाहतुकीस धोकादायक बनलेला वासुकाका जोशी पूल येणऱ्‍या वर्षात नव्याने उभा राहिलेला दिसेल, असेही त्यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे राजापुरात निर्माण झालेली पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार राणे राजापुरात आले होते. त्यांनी शहरातील जवाहर चौकात व बाजारपेठेबरोबर अर्जुना आणि कोदवली नदीला आलेल्या पूरस्थितीची पाहणी केली. या वेळी भाजप नेते नीलेश राणे, भाजप जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, काँग्रेसच्या माजी आमदार अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमिर खलिफे, व्यापारीसंघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, मुख्याधिकारी प्रशांत भोसले आदी उपस्थित होते. दोन्ही नद्यांतील गाळ काढणे आवश्यक असून शहरात नव्याने लादण्यात आलेल्या पूररेषेबाबतही फेरसर्वेक्षण व्हावे, अशी मागणी नागरिकांनी केली. त्याबाबत राणे यांनी पूरसमस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून मार्ग काढण्याची ग्वाही दिली. राजापूरकरांची पूर आणि पूररेषेतून कशी सुटका करता येईल यासाठीही आपण प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.