खेड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

खेड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Published on

खेड ग्रामीण भागातील
विद्यार्थ्यांना मदतीचा हात

खेड ः तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी परिस्थितीअभावी शिक्षणापासून वंचित राहू नयेत याकरिता तालुका रहिवासी मंच-मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी गरजूंना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तालुक्यातील ८ प्राथमिक शाळांमधील ३५० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. या मंचच्यावतीने तालुक्यातील सुसेरी नं. १ व २ खारी, नांदगाव, कोरेगाव, मुंबके, कर्जी, राजवेल आदी प्राथमिक शाळेतील प्रत्येकी एक विद्यार्थी अशा तब्बल ३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. या वेळी मंचचे अध्यक्ष मंगेश तरडे, उपाध्यक्ष विजय जाधव, सचिव मंगेश चव्हाण, खजिनदार सुशांत कदम, माजी अध्यक्ष नवनाथ निंबाळकर आदी उपस्थित होते.
-----
तुळसणीत हळदीची लागवड

देवरूख ः संगमेश्वर तालुका अॅग्रो स्टार फार्म फ्रेश प्रोड्युसर कंपनीच्या सहकार्याने तुळसणी येथील नवनिर्वाचित दत्तकृपा, जुगाई आणि कुलस्वामिनी या तीन महिला बचतगटांनी आग्रेवाडी या ठिकाणी एसके ४ या जातीच्या रोपांची हळद पिकाची सामूहिक पद्धतीने लागवड केली आहे. अंदाजे २० गुंठ्यांत ३ हजार रोपांच्या माध्यमातून हळद लागवडीमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि उत्पन मिळण्याची अपेक्षा आहे. तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मृणालिनी यादव यांच्या अथक प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी झाला. अॅग्रोस्टार कंपनीचे चेअरमन विलास शेलार यांनी एसके ४ या जातीच्या रोप लागवडीसाठी मार्गदर्शन केले.
-----

तायक्वांदो निवड चाचणीत
पैसाफंडच्या दोघांची निवड

संगमेश्वर ः राजापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो निवड चाचणीत पैसाफंड इंग्लिश स्कूलच्या गंधर्व शेट्ये आणि ओम घाग यांची निवड झाली आहे. बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत गंधर्व शेट्ये आणि ओम घाग यांची निवड झाली आहे. हे दोघेही पैसाफंड इंग्लिश स्कूलच्या विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकत आहेत. प्रशालेतर्फे या दोघांचा त्यांच्या पालकांसमवेत व्यापारी पैसाफंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दोघांनाही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संस्था आणि प्रशालेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी मुख्याध्यापक सचिन खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे, पालक सुजित शेट्ये, योगेश घाग आणि प्रशालेतील शिक्षक उपस्थित होते.
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.