सावंतवाडी बसस्थानक परिसर स्वच्छ

सावंतवाडी बसस्थानक परिसर स्वच्छ

96181

सावंतवाडी बसस्थानक परिसर स्वच्छ
‘सामाजिक बांधिलकी’चा उपक्रमः प्रसाधनगृहाबाबत वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून येथील वेंगुर्ले बसस्थानक परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात प्रसाधनगृहाच्या परिसरात वाढलेली झाडेझुडपे, कुजलेल्या भाज्या, काचेच्या फुटलेल्या बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या आदी कचरा ‘सामाजिक बांधिलकी’च्या कार्यकर्त्यांनी उचलून बसस्थानक परिसर स्वच्छ केला. तसेच कित्येक दिवस बंद असलेले प्रसाधनगृह तत्काळ सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.
ऐन पावसाळ्यात बंद असलेल्या प्रसाधनगृहामुळे सावंतवाडी बसस्थानकावरील प्रवासी महिला, विद्यार्थी, मधुमेहाचे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक व त्या परिसरातील व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत प्रवाशांनी ''सामाजिक बांधिलकी''चे लक्ष वेधल्यानंतर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आज स्वतः पुढाकार घेत परिसराची स्वच्छता केली. हे प्रसाधनगृह लवकरात लवकर सुरू करून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी आगार व्यवस्थापकांचेही लक्ष वेधले. प्रसाधनगृह तातडीने सुरू करण्यासाठी ज्या काय त्रुटी आहे, त्या एसटी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दूर करून प्रसाधनगृह लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सामाजिक बांधिलकीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
एसटी बसस्थानकाचे प्रसाधनगृह नेहमीच स्वच्छ व कायमस्वरुपी सुरू आणि स्वच्छ राहावे, यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एका स्वच्छतादूताची नियुक्ती करण्यात येणार असून, त्याला दरमहा मानधन देण्यात येणार आहे. त्यासाठी तेथील व्यावसायिक मनवेल डिसोजा यांनी जबाबदारी स्वीकारली आहे.
''सामाजिक बांधिलकी''चा हा स्वच्छता अभियान उपक्रम यशस्वी होण्यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राजू मसुरकर तसेच सावंतवाडी पालिकेचे स्वच्छता अधिकारी दीपक म्हापसेकर व सफाई कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमामध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, सचिव समीरा खलील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, रवी जाधव, हेलन निब्रे, रुपा मुद्राळे, सुजय सावंत व शामराव हळदणकर यांनी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com