-तीनवेळा रस्त्यांचे काम करूनही खड्डे कायम

-तीनवेळा रस्त्यांचे काम करूनही खड्डे कायम

Published on

-rat१०p२७.jpg-
२४M९६२००
खेड ः सहा महिन्यांत तीनवेळा रस्त्याचे काम करूनही खड्डे कायम.
------------
रस्त्यांचे काम करूनही खड्डे कायम

भरणेतील खड्ड्यातच वृक्षारोपण : संतोष नलावडेंचा उपोषणाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ११ ः मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी ठेकेदार कंपनीने ६ महिन्यात तीनवेळा रस्ते बनवूनही सद्यःस्थितीत सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे मध्यवर्ती ठिकाणाला खड्ड्यांचे रूप प्राप्त झाले आहे. ठेकेदार कंपनीने ही बाब गांभीर्याने घेऊन मार्ग सुस्थितीत न आणल्यास याच खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून स्वातंत्र्यदिनी उपोषण छेडण्याचा इशारा माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष नलावडे यांनी दिला आहे.
भरणे येथील मध्यवर्ती ठिकाण आधीच विविधांगी समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. त्यात ठिकठिकाणी पावसाच्या साचणाऱ्या पाण्याचीही भर पडल्याने महिन्यात तीनवेळा डांबरीकरण करूनही वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच मध्यवर्ती ठिकाणच्या परिसरातील सर्व्हिस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भरणे येथील सर्व्हिस रोडलगतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व दुसऱ्या बाजूला नवभारत व कनिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात १६०० हून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. आधीच रस्ता ओलांडून महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागत आहे. त्यात खड्ड्यांची भर पडल्याने वाहनचालकांसह पादचारी व विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसथांब्यानजीकचा सर्व्हिस रोड खड्ड्यातच गेला आहे. खड्ड्यांतून मार्गक्रमण करताना वाहनचालक अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. खेडच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसेस व अवजड वाहनांना वळण घेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्यही निर्माण झाले आहे. खड्डेमय परिसराची ठेकेदार कंपनीने तातडीने दखल घेऊन मार्ग सुस्थितीत आणण्याच्यादृष्टीने तातडीने कार्यवाही न केल्यास स्वातंत्र्यदिनी खड्ड्यातच वृक्षारोपण करून उपोषण छेडण्याचा इशारा नलावडे यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.