चित्पावन ब्राह्मण मंडळात अभंगवाणी

चित्पावन ब्राह्मण मंडळात अभंगवाणी

Published on

चित्पावन ब्राह्मण मंडळात
१७ जुलैला अभंगवाणी
रत्नागिरी, ता. १० : आषाढी एकादशीनिमित्त अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे हे दहावे वर्ष असून, १७ जुलैला सायंकाळी साडेपाच वाजता जोशी पाळंद येथील भगवान परशुराम सभागृहात ही मैफल होईल.
यावेळी प्रसाद शेवडे (देवगड) आणि सौ. भाग्यश्री आठल्ये-जोशी (देवगड) हे गायक कलाकार अभंग म्हणणार आहेत. वामन जोग निवेदनातून विठ्ठलभक्तीचा महिमा उलगडणार आहेत. मैफलीसाठी ऑर्गन साथ संतोष आठवले, हार्मोनियम साथ निरंजन गोडबोले, तबला साथ निखिल रानडे, पखवाज साथ गणेश रानडे आणि तालवाद्याची साथ सुहास सोहनी करणार आहेत. एस. कुमार साऊंडचे उदयराज सावंत ध्वनी संयोजन करणार आहेत. संगीतप्रेमी रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.