ःसावकारी कर्जाच्या वसुलीसाठी धमकी

ःसावकारी कर्जाच्या वसुलीसाठी धमकी
Published on

सावकारी कर्जाच्या वसुलीसाठी धमकी

दोघांवर गुन्हा ; आणखी एक सावकारी प्रकरण उजेडात

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १०ः ट्रॅव्हल व्यवसायासाठी सावकारी कर्ज घेतलेल्या एका व्यावसायिकाला दोन संशयितांनी कर्ज वसुलीसाठी शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश नंदाने (वय ३३) व अमोल श्रीनाथ (वय ४५, दोघेही रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना २२ डिसेंबर २०२३ ते ९ जुलै २०२४ या कालावधीत जयस्तंभ-रत्नागिरी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मंदार प्रवीण वारेकर (वय ३८, रा. गोडावून स्टॉप, नाचणे रोड, रत्नागिरी) यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांनी संशयित राजेश नंदाने यांच्याकडून १० टक्के व्याजाने दीड लाख रुपये कर्जाऊ घेतले होते. हे पैसे अमोल श्रीनाथ यांचे असल्याचे सांगून त्याला ही रक्कम देण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी ९१ हजार ५०० रुपये दिले. त्यानंतरही संशयितांनी फिर्यादी यांच्याकडे अधिक व्याजाच्या रक्कमेची मागणी केली व शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी मंदार वारेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक शहर पोलिस अमंलदार करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com