विद्यार्थी-शिक्षकांमध्ये समन्वय आवश्यक

विद्यार्थी-शिक्षकांमध्ये समन्वय आवश्यक

swt१०२०.jpg मध्ये फोटो आहे.

मसुरे ः येथील आर. पी. बागवे हायस्कूल येथे मार्गदर्शन करताना संस्थाध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक परब. बाजूला आशिष पेडणेकर व अन्य मान्यवर.


विद्यार्थी-शिक्षकांमध्ये समन्वय आवश्यक
डॉ. दीपक परब ः मसुरे हायस्कूलमध्ये गुणवंत गौरव
सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. १० : जीवनात शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी साहित्य जास्त वाचावे. शाळेच्या व जिल्ह्यातील मुलांना सुद्धा आज बक्षीस वितरण झाले, ही अभिमानाची बाब आहे. अभ्यासातील गणित मला जमले नाही; पण व्यवसायाचे गणित चांगले जमल्यामुळे आज तुमच्यासमोर उभा आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या एकत्रित मेहनतीमुळे शाळेचा चांगला निकाल येत आहे. मुलांनी मनातून न्यूनगंड काढून टाकावा. ज्या शाळेमुळे मी घडलो ती शाळा माझी आहे, अशी आठवण ठेवा, असे प्रतिपादन मसुरे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक परब यांनी येथे केले.
आर. पी. बागवे हायस्कूल आणि तांत्रिक विद्यालय मसुरे येथे (कै.) मदन राजाराम बागवे शिक्षण निधी योजना व संस्थेकडे दानशूर दात्यांनी ठेवलेल्या ठेवीवरील व्याजातून प्रशालेतील, जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, सरोज परब, लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, मुख्याध्यापिका अर्चना कोदे, उद्योजका राधिका परब, दिपलक्ष्मी पेडणेकर, कृषी रत्न मिलिंद प्रभू, डॉ. सुधीर मेहेंदळे, रमेश परब, पंढरीनाथ नाचणकर, दतप्रसाद पेडणेकर, बाळू परब, पंढरीनाथ मसूरकर, भाऊ बागवे, अप्पा परब, सुरेश चव्हाण, रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.
आशिष पेडणेकर यांनी संस्थाध्यक्ष उद्योजक डॉ. परब यांचे आदर्शवत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात विद्यार्थी व शिक्षक यांच्यात चांगला जिव्हाळा जाणवतो. विद्यार्थ्यांनी इंग्लिश बोलण्याचा सराव करावा, म्हणजे शहरातील स्पर्धेत मागे राहणार नाही. तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा आणि यशस्वी व्हा, असे आवाहन केले. सौ. परब यांनी सांगितले की, परिस्थितीवर मात करून शिक्षण घ्या. तुमची वेगळी ओळख जीवनात निर्माण करा. बागवे म्हणाले की, शिक्षक व संस्था चालकांना विद्यार्थ्यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. संस्थाध्यक्ष परब यांचे या संस्थेला मोठे सहकार्य लाभले आहे. या संस्थेमुळे आपण शिक्षण घेऊ शकलो, याची जाणीव सर्व विद्यार्थ्यांनी ठेवावी.
यावेळी आदर्श विद्यार्थी प्रशांत सांडव व आदर्श कर्मचारी म्हणून लिपिक दयानंद पेडणेकर यांचा सन्मान करण्यात आला. सहायक शिक्षक रमेश पाताडे, सुनील बांदेकर, शशांक पिंगुळकर, एन. एस. जाधव, श्री. घाटे, भरत ठाकूर, श्री. कांबळे, श्री. चौगले, सौ. मसुरेकर, सोनाली कोदे, विशाखा जाधव, आर्या भोगले, समीर नाईक, दयानंद पेडणेकर, भानुदास परब, अनिल मेस्त्री, चरणदास फुकट, श्री. हळवे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सौ. कोदे यांनी केले. श्री. कांबळे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com