कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्व पदावर

कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्व पदावर

Published on

कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्व पदावर
सकाश वृत्तसेवा
कणकवली, ता. ११ः पेडणे येथे रेल्वे मार्गावर पाणी आणि चिखल साचल्यामुळे विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. आज दिवसभरातील सर्व गाड्यांच्या फेऱ्या सुरू झाल्या होत्या. मात्र, लांब पल्ल्याच्या काही गाड्या सोलापूर पुणे मार्गे वळविण्यात आल्या आहेत. वंदेभारत आणि मंगळूर एक्सप्रेस मात्र रद्द करण्यात आली.
कोकण रेल्वे मार्गावर गोवा राज्यात पेडणे येथे ९ जुलैला दुपारी तीन वाजता बोगद्यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक टप्प झाली होती. जवळपास दीड दिवसानंतर रेल्वे मार्गाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आले. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. तर काही गाड्या सावंतवाडी स्थानकापर्यंत थांबविल्या होत्या. तेथून परतीसाठी मुंबईकडे निघाल्या होत्या. मात्र, आज पासून कोकण रेल्वे मार्गाची वाहतूक पूर्वपदावर आली असून मुंबईहून सुटणाऱ्या सर्व गाड्या आज नियोजित वेळेत धावत होत्या. मंगलोर ते सीएसटी जाणारी मंगळूर एक्सप्रेस रद्द केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.