अभिषेक, आकांक्षा आमदार चषकाचे मानकरी

अभिषेक, आकांक्षा आमदार चषकाचे मानकरी

Published on

- rat११p९.jpg-
P२४M९६३२४
लांजा - पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद पटकावणारा अभिषेक चव्हाण सन्मानचिन्ह स्वीकारताना.

अभिषेक, आकांक्षा आमदार चषकाचे मानकरी

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा; आमदार साळवी यांच्या ढदिवसानिमित्त आयोजन

सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ११ ः आमदार राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने लांजा तालुका कॅरम असोसिएशन आयोजित आमदार चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत एकेरीमध्ये पुरुष गटात अभिषेक चव्हाण आणि महिला गटात आकांक्षा कदमने विजेतेपद पटकावले.
लांजा येथील कुणबी सेवा संघाच्या सभागृहात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन ठाकरे युवासेनेच्या राज्य कोअर कमिटी सदस्य अथर्व साळवी, दीपाली साळवी, जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, लांजा तालुका कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राहुल शिंदे, अमित देसाई, मिलिंद साप्ते, प्रसाद माने, साईप्रकाश कानिटकर, मंदार दळवी तर पारितोषिक वितरण खजिनदार नितीन लिमये, राहुल बर्वे यांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये अभिषेक चव्हाणने विरुद्ध रियाज अकबरअली (२५-००, २५-१३) पराभव करत आमदार चषकावर नाव कोरले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात रियाज अकबरअलीने राहुल भस्मे (२५-००,२५-१६) तर अभिषेक चव्हाणने योगेश कोंडविलकरचा (२५-१४, २५-००) पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. पुरुष गटातील दुहेरी सामन्यात रियाज अकबरअली-अभिषेक चव्हाण या जोडीने सागर सावंत-मुक्तानंद वरवडेकर या जोडीचा (२५-१७, २५-००) पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात रियाज-अभिषेक चव्हाण जोडीने विजय कोंडविलकर जोडीचा (२५-०५,२५-०१) तर सागर सावंत-मुक्तानंद वरवडेकर जोडीने राहुल भस्मे जोडीचा (१६-२४, २५-१६ ,२५-१६) पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. महिला गटात आकांक्षा कदमने निधी सप्रेचा (२५-००, २५-००) सरळ सेटमध्ये पराभव करत आमदार चषक पटकावला. कुमार गटात ओम पारकरने द्रोण हजारेचा (२५-००, २५-००) आणि किशोर गटात आर्यन राऊतने सोहम बुटालाचा (२०-०६, २५-०१) आणि स्मित कदमने आयुष चव्हाणचा (२५-०४, २३-००) पराभव करत आपापल्या गटाचे विजेतेपद पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com