ठाकरे सेनेकडून राजापुरात विधानसभेची तयारी

ठाकरे सेनेकडून राजापुरात विधानसभेची तयारी

- rat११p१३.jpg -
२४M९६३३०
राजापूर ः मुंबईस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना आमदार राजन साळवी, तालुकासंपर्कप्रमुख अनिल भोवड आणि पदाधिकारी.

विधानसभा निवडणुकीची तयारी-------लोगो

ठाकरे सेनेकडून मुंबईस्थित पदाधिकाऱ्‍यांच्या बैठका

आमदार साळवींची उपस्थिती; मोर्चेबांधणीस सुरवात, हॅट्ट्रिक साधण्याचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच आता साऱ्‍यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. शिवसेना उपनेते आमदार डॉ. राजन साळवी यांच्या उपस्थितीत आणि तालुका संपर्कप्रमुख अनिल भोवड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईस्थित पदाधिकऱ्‍यांच्या जिल्हा परिषद विभागनिहाय बैठकांना सुरवात झाली आहे. या बैठकांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचा निर्धार सर्वानुमते करण्यात येत आहे.
मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीला आमदार साळवी यांच्यासह राजापूर तालुका संपर्कप्रमुख भोवड, तालुका सहसंपर्कप्रमुख जगन्नाथ कदम, शिवसहकार सेनेचे सुधीर मोरे, विभाग संपर्कप्रमुख गणेश बाईग, संदीप नाचणेकर, तुलशीदास नवाळे, चंद्रकांत गुंड्ये, प्रकाश कानडे, संदेश खडपे, तालुका युवा अधिकारी संदेश मिठारी, चंद्रकांत कांबळे, माजी नगरसेवक वसंत नकाशे यांच्यासह मोठ्या संख्येने गाव संघटक, संपर्क प्रमुख, युवासेना व सोशल मीडिया प्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते. राजापूर तालुक्यातील कोदवली, केळवली, देवाचेगोठणे, सागवे विभागाच्या मुंबईत राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीमध्ये लोकसभा निवणडणुकीत झालेले मतदान आणि मिळालेले मताधिक्य याचाही आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर मताधिक्य कुठे घटले यावर महत्वपूर्ण चर्चा झाली. ती कसर आगामी विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याचा निर्धार या चर्चेत करण्यात आला. त्यासाठी मुंबईस्थित पदाधिकाऱ्यांनी आतापासून संघटनात्मक बांधणी करण्यास सुरवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच गाव आणि वाडीमध्ये जाऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घ्या, अशा सूचना केल्या आहेत. प्रत्येक गाव संघटकांनी आपापल्या गावाकडे लक्ष केंद्रित करून ग्रामीण पदाधिकाऱ्यांसमवेत समन्वय ठेवा व विभागातील विकासात्मक कामांचा आढावा घ्या, असेही सांगण्यात आले.

----
कोट

आतापासून जनसंपर्क वाढवण्यास सुरवात करा. मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावाकडे लक्ष केंद्रीत करून गावभेटीवर लक्ष द्या जेणेकरून निवडणूक जाहीर झाल्यानंतर तारांबळ उडणार नाही.

- डॉ. राजन साळवी, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com