राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ४० कोटीचा निधी

राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ४० कोटीचा निधी

Published on

-rat११p१४.jpg -
२४M९६३३१
राजापूर ः पत्रकार परिषदेत माहिती देताना पालकमंत्री उदय सामंत.
-----------------

राजापूरच्या विकासासाठी ४० कोटींचा निधी

उदय सामंत ः कम्युनिटी सेंटरसाठी २ कोटी रुपये
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ : महायुती शासनाच्या माध्यमातून राजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून गेल्या दोन वर्षामध्ये राजापूरच्या पायाभूत विकासासाठी २६ कोटी ६८ लाख तर डीपीडीसीच्या माध्यमातून १४ कोटी असा सुमारे ४० कोटींचा निधी विविध विकास कामांसाठी उपलब्ध करून दिला आहे. शहरात नव्याने होणाऱ्या कम्युनिटी सेंटरसाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहावर मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. श्री देव धूतपापेश्वर देवस्थानचा होत असलेला विकास, नव्याने विश्रामगृह उभारणीसाठी ३ कोटी रुपयांचा निधी, सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि भविष्यात एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दिलासा देण्याचा प्रयत्न असून, या योजनेची प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. ही योजना सर्वसामान्य महिलेपर्यंत पोहचून तिचा लाभ व्हावा यासाठी तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आली. या समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून शुभांगी डबरे, प्रभावती कानडे, हर्षदा खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. राजापूरच्या पूररेषेच्या प्रश्नाबाबत लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.