शाळा परिसरातील अवैध प्रकार रोखा

शाळा परिसरातील अवैध प्रकार रोखा

96383

शाळा परिसरातील अवैध प्रकार रोखा
शांतता समितीः सावंतवाडीतील बैठकीत प्रशासनाकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ः सार्वजनिक, रहदारीच्या मार्गावर आणि शाळांच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने पार्किंग करून ठेवली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील शाळांच्या जवळपास दारू, अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी मोहरमच्या पार्श्वभूमीवर सभा आयोजित केली होती.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सावंतवाडी व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, तानाजी वाडकर, सीताराम गावडे, अॅड. नकुल पार्सेकर, अभिमन्यू लोंढे, अफरोज राजगुरू, तौकीर शेख, सुरेश भोगटे, रफिक मेमन, बाळासाहेब बोर्डेकर, ऑगोस्तीन फर्नांडिस आदी उपस्थित होते.
सावंतवाडी शांतताप्रिय, सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी प्रत्येक सण उत्साहात व शांततेत साजरा केला जातो, असे उपस्थितांनी सांगितले. यावेळी सोशल मीडियावर लक्ष ठेवावे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर कोणी करत असेल, तर लक्ष ठेवून कारवाई करावी, असे सूचविण्यात आले. सावंतवाडी शहरात पालिका ते आरपीडी हायस्कूलच्या पुढे बॅंकेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग होत असल्याने एसटी बस मार्गावरून जाताना अडथळा निर्माण होतो. या ठिकाणी महाविद्यालय, हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना त्रास, अडथळा निर्माण होतो. बसस्थानक असलेल्या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होते. मिलाग्रीस हायस्कूल भरताना व सुटताना वाहतूक कोंडी होते. जयप्रकाश, गांधी चौकात वाहतूक कोंडी होते. यावर रस्ता मार्ग मोकळा होईल, अशी कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
शहरात शाळांच्या जवळपास दारू, अमली पदार्थ विक्री होत असल्याचे बोलले जात आहे. ते अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करावी. अवैध धंदे बंद करून भावी पिढीचे संरक्षण करावे. याबाबत चर्चा होऊन पोलिस निरीक्षकांनी लक्ष घालावे, असे सुचविण्यात आले.

चौकट
कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणार
यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण म्हणाले, "मी नुकताच पदभार स्वीकारला आहे. आपल्या सुचनांचे कारवाईत रुपांतर करण्यासाठी प्राधान्य देईन. आंबोली पावसाळी पर्यटनस्थळी लक्ष दिला जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी खबरदारी घेतली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com