खवणे खाडीपात्रात दूषित पाणी

खवणे खाडीपात्रात दूषित पाणी

Published on

96432

खवणे खाडीपात्रात दूषित पाणी
ग्रामस्थांचा आरोपः संबंधित कंपनीवर कारवाई करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ः माशांवर प्रक्रीया करणाऱ्या एका खासगी कंपनीने खवणे (ता. वेंगुर्ले) खाडीपात्रात दूषित पाणी सोडल्याचा आरोप करत याबाबत योग्य ती कारवाई करावी; अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा खवणे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
खवणे येथील ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी तावडे यांची भेट घेऊन ५६९ ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, केळूस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात माळरानावर असलेल्या एका खाजगी कंपनीत माशांवर प्रक्रीया केली जाते. प्रक्रीयेदरम्यान निर्माण झालेले नाशिवंत पाणी कंपनीने माळरानावर मोठ्या टाक्या खोदून तेथे साठवून ठेवले जाते. पावसाळ्यामध्ये ते पाणी मोठ्या पाईपद्वारे म्हापण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील खवणे खाडीपर्यंत येणाऱ्या ओहोळात सोडले जाते.
२७ जुनला मोठ्या पावसाचा फायदा घेत कंपनीने ते दूषित पाणी पाईपद्वारे खवणे खाडीपात्रामध्ये सोडले असून त्यामुळे खाडीतील पाणी रसायनयुक्त, फेसाळलेले व अतीशय घाण झालेले आहे. त्यामुळे संपुर्ण खवणे परीसरात दुर्गंधी पसरलेली आहे. या सर्व प्रकारामूळे सर्व ग्रामस्थ हवालदील झालेले असून या प्रकारे प्राणघातक, दुषित पाणी सार्वजनिक खाडीमध्ये सोडणाऱ्या कंपनीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसे न केल्यास आंदोलन छेडू, असा इशारा दिला आहे.
निवेदनावर अविनाश खोत, हेमंत परब, चंद्रकांत घाडी, विलास मोडकर, दत्ताराम साटम, श्रेया परब, छाया परब, स्वरा परब, सावित्री परब यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

चौकट
खाडीतील मासे मृत
संबंधित कंपनीने खवणे खाडीपात्रात दूषित पाणी सोडल्याने मासे मृत झाले असून पावसाळी हंगामात स्थानिक लोकांचे मासेमारीचे रोजीरोटीचे साधन नष्ट झाले आहे. तसेच हे पाणी खाडीनजीक असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहीरींमध्ये जावून त्यामुळे स्थानिक नागरीकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.