खेड-कशेडी बोगद्यातून पुन्हा गळती

खेड-कशेडी बोगद्यातून पुन्हा गळती

Published on

-rat11p29.jpg
96441
खेड : कशेडी बोगद्याच्या आतील भागातील गळती काढण्यासाठी सुरू असलेले ग्राउटिंगचे काम करताना.

-rat11p30.jpg
96442
ग्राउटिंगच्या कामाची पाहणी करताना राष्ट्रीय बांधकाम विभागाचे अधिकारी.

कशेडी बोगद्यात पुन्हा गळती

धोकादायक स्थिती; राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग उदासीन
खेड, ता. ११ : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला लागलेली गळती काढण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने केला होता; परंतु बुधवारी पुन्हा या बोगद्यातून दोन ते तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. खेडकडील बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ शंभर मीटरच्या अंतरात मोठी गळती सुरू आहे. बोगद्यात शिरताच दुचाकी व चारचाकी वाहनचालक या पाण्याच्या फवाऱ्याने भिजत आहेत. या ठिकाणी पाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून प्लास्टिकचा वापर केल्याचे निदर्शनास आले.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील एका मार्गिकेतून लहान वाहनांसाठी मुंबई व गोव्याच्या दिशेला जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासाचा कालावधी कमी झाला आहे. या बोगद्यात सिमेंटच्या छताला गळती लागली आहे. हा प्रकार अतिशय धोकादायक असून, ही बाब सर्वच माध्यमांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बांधकाम विभागाने तज्ज्ञांचा सल्ला घेत गळती लागलेल्या ठिकाणी सिमेंट भरले होते. कशेडी बोगद्यातून मोठ्या प्रमाणात गळणारे पाणी रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या ठेकेदार व अभियंत्यांनी केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरल्या आहेत, असेच चित्र आहे.
-----------
कोट
कशेडी बोगद्यात पावसाच्या पाण्यामुळे सुरू असलेली गळती काढण्याचे काम गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहे. हे काम अजून १० ते १२ दिवस चालणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर ती गळती पूर्णपणे थांबेल.
- पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय बांधकाम विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.